Home बीड केजमध्ये नातवाने केला आजोबांचा निर्घृणपणे खून; डोक्यावर आणि मानेवर कोयत्याने केले वार

केजमध्ये नातवाने केला आजोबांचा निर्घृणपणे खून; डोक्यावर आणि मानेवर कोयत्याने केले वार

40
0

आशाताई बच्छाव

IMG_20240306_065421.jpg

केजमध्ये नातवाने केला आजोबांचा निर्घृणपणे खून; डोक्यावर आणि मानेवर कोयत्याने केले वार

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/केज दि: ०५ मार्च २०२४ रोजी मंदिरातून दर्शन घेऊन निघालेल्या आजोबावर नातवाने वैद्याने डोक्यावर व मानेवर सपासप वार करून निर्घृणपणे खून केल्याची खळबळजनक घटना केज शहरातील कानडी रोडवर आज सकाळी ०७:३० वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान घटनेनंतर हत्यारा नातू हा स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाला. केज शहरातील कानडी रोड लगत असलेल्या सिद्धिविनायक गणेश मंदिरात गिरधारी किशनलाल शिल्लक वय (६० वर्ष) मंगळवारी सकाळी दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना मंदिरात दबा धरून बसलेला त्यांचा चुलत नातू रोहित रतन शिल्लक वय (२५ वर्ष, रा.केज) यांनी गिरधारी शिल्लक यांना आडबाजूला ओढत नेत त्यांच्यावर धारदार शस्त्राने डोक्यावर व मानेवर तपासत तब्बल १३ वार केले. यामुळे गिरधारी यांची डोक्याची कवटी फुटून मानेच्या शिरा तुटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या हल्ल्यानंतर आरोपी नातू रोहित हा स्वतःच केज पोलीस ठाण्यात हजर झाला. आजोबाचा खून रोहितने केला असल्याचे कळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला. तसेच शवविच्छेदनासाठी गिरधारी यांचा मृतदेह केजच्या उपजिल्हा रुग्णालय नेहण्यात आला. दरम्यान हत्यारा रोहित हा मागील दोन दिवसापासून चुलत आजोबा गिरधारी यांच्यावर पाळत ठेवून होता. आजोबा गिरधारी हे नित्यनेमाने दररोज सकाळी कानडीरोडवरील सिद्धिविनायक गणेश मंदिरात दर्शनाला जात असून मंदिराच्या परिसरात सकाळच्या वेळी वर्दळ कमी असते. याच संधीचा फायदा घेत हत्यारा रोहितने आजोबा गिरधारी यांचा काटा काढला. याप्रकरणी कलम ३०२ भादवी प्रमाणे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

Previous articleजगभरातील फेसबुक इंस्टाग्राम अचानक बंद
Next articleअखेर अजय गोपीचंद मेश्राम यांचे आमरण उपोषण मागे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here