Home भंडारा अखेर अजय गोपीचंद मेश्राम यांचे आमरण उपोषण मागे

अखेर अजय गोपीचंद मेश्राम यांचे आमरण उपोषण मागे

53
0

आशाताई बच्छाव

IMG_20240306_065723.jpg

अखेर अजय गोपीचंद मेश्राम यांचे आमरण उपोषण मागे

विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लेखी पत्र देऊन मागण्यांची पूर्तता करण्याचे दिले लेखी आश्वासन

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी )दिनांक 5 मार्च 2024 ला अखिल भारतीय धृवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या महावितरण कंपनी विद्युत विभागाच्या जुलमी निर्णया विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे भंडारा पवनी विधानसभा अध्यक्ष अजय गोपीचंद मेश्राम यांचे मागील सहा दिवसापासून सुरू असलेल्या आमरण उपोषण मंडपाला एकाही विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली नव्हती . सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे यांनी त्रिमूर्ती चौकात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषण मंडपाला 5 मार्चला 11 वाजता भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मीडियाच्या माध्यमातून आव्हान केले होते .. त्याच दिवशी 5 मार्चला दुपारी 2 वाजता विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ अभियंता गिरी ,जयस्वाल ,भुसारी यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन अजय गोपीचंद मेश्राम यांना नींबू सरबत पाजून मागण्यांची पूर्तता करण्याबाबत लेखी पत्र देऊन आमरण उपोषण सोडविले. त्यांनी केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये थकबाकीदारांना विद्युत बिल भरण्यास मुदत देण्यात यावी, प्रीपेड मीटर संबंधित पायाभूत सुविधा पुरविण्यात यावी ,प्रीपेड मीटर लावण्यासाठी सक्ती करू नये व तो ऐच्छिक करण्यात यावा ,शेतकऱ्यांना 24 तास विद्युत पुरवठा करण्यात यावा, इत्यादी मागण्याकरता ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत. विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की ,त्यांनी तात्काळ आमरण उपोषण मंडपाला भेट देऊन मागण्या पूर्ण कराव्यात व आमरण उपोषण मागे घ्यावे अशी मागणी अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी उपोषण मंडपाला प्रत्यक्ष भेट देऊन केलेली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here