Home मुंबई जगभरातील फेसबुक इंस्टाग्राम अचानक बंद

जगभरातील फेसबुक इंस्टाग्राम अचानक बंद

117

आशाताई बच्छाव

IMG-20240305-WA0293.jpg

मुंबई, सविता तावरे स्पेशल रिपोर्टर– मेटाकडून दिल्या जाणाऱ्या अनेक सेवा डाऊन झाल्या आहेत. यामुळे फेसबुक आणि इंस्टाग्रामची सेवा बंद झाल्याच्या तक्रारी भारतासह जगभरातून येत आहेत. अनेकांचे फेसबुक अकाउंट अपोआप लॉग आउट झाले आहे. तर इंस्टाग्रामचे अनेक फिचर्स काम करत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
Downdetectorने दिलेल्या माहितीनुसार मेटाकडून दिल्या जाणाऱ्या सेवा भारतीय वेळेनुसार ९ वाजून १० मिनिटापासून डाऊन आहेत. मोबाईल अॅपसह वेब सर्व्हिस देखील काम करत नाही. फेसबुकचे अॅप देखील डाऊन आहे.
इंस्टाग्रामवरील सर्च, कमेंट सेक्शन काम करत नसल्याचे काही युझर्सनी म्हटले आहे. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगातील फेसबुक आणि इंस्टाग्रामची सेवा डाऊन झाली आहे. याबाबत मेटाकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.

याआधी कॅब्रिज अनॅलिटिका फेसबुक डेटा लीकच्या दरम्यान फेसबुक युझर्सचे अकाउंट स्वत:हून लॉग आउट झाले होते. नंतर ही गोष्ट समोर आली की कोट्यवधी लोकांचा फेसबुक डेटा लीक झाला आहे. आता नेमका काय प्रॉब्लेम झाला आहे हे स्पष्ट झालेले नाही.

Previous articleमोठ्ठी बातमी! भारतात फेसबुक आपोआप झाले बंद
Next articleकेजमध्ये नातवाने केला आजोबांचा निर्घृणपणे खून; डोक्यावर आणि मानेवर कोयत्याने केले वार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.