Home सामाजिक विचार माझे —– लेखणी माझी नवीन वर्ष २०२४ प्रभातपुष्प—५३८ कन्यादान == एक महादान

विचार माझे —– लेखणी माझी नवीन वर्ष २०२४ प्रभातपुष्प—५३८ कन्यादान == एक महादान

25
0

आशाताई बच्छाव

IMG_20240303_090506.jpg

विचार माझे —– लेखणी माझी नवीन वर्ष २०२४
प्रभातपुष्प—५३८

कन्यादान == एक महादान

कन्यादान हा हिंदू विवाह परंपरेतील एक धार्मिक आणि महाविधी आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. या परंपरेचा संभाव्य उगम दक्षिण भारतातील विजयनगर साम्राज्यात सापडलेल्या १५ व्या शतकातील शिलालेखांवरून शोधला जाऊ शकतो. असा उल्लेख आढळतो.
हिंदू धर्मात जेव्हा तरुण पुरुष आणि तरुण स्त्री कुटुंब उभारणीच्या कार्याची जबाबदारी घेण्यास शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम होते किंवा त्यांना परिपक्वता प्राप्त होते तेव्हा हा विवाह सोहळा पार पाडला जातो. आणि दोन कुटुंबे या निमित्ताने विवाह बंधनात एकत्र येतात. या धार्मिक विधीच्या निमित्ताने समाजातील उच्चभ्रू लोक, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, सगेसोयरे, मित्रमंडळी आणि देवतांची उपस्थिती आवश्यक मानली जाते, जेणेकरून त्यांच्यापैकी कोणी या कर्तव्याकडे दुर्लक्षित केल्यास त्याला आळा घालण्यात यावा, कोणत्याही कारणास्तव कुटुंबात होणारे वादविवाद एकत्रित बसून ते सहजपणे सोडविण्यात यावेत. आणि एकत्र कुटुंब पद्धती टिकून रहावी हाच एकमेव उद्देश असतो.
एक पिता आपल्या मुलीला जन्म देतो, लहानचे मोठे करतो आणि उच्च दर्जाचे शिक्षण देतो आणि एका ठराविक वयात तीचेहात पिवळे करून तिला साजेशा किंवा आपल्या बरोबरीच्या कुटुंबात विवाह लावून देतो. म्हणजेच आपला काळजाचा तुकडा समोरील कुटुंबातील वराच्या स्वाधीन करतो. यानंतर, जेव्हा वर मुलगा मुलीचा हात हातात धरून एक पिता त्यावर हात धरतो आणि सांगतो माझी मुलगी आज मी तुम्हाला देत आहे तिला कोणतेही दुःख होणार नाही याची काळजी घ्या तिचा योग्य रित्या सांभाळ करा , आज पर्यंत मी तिचा योग्य रीतीने सांभाळ केला आहे आता ही जबाबदारी तुमची आहे आणि मग वरराजा अशी प्रतिज्ञा घेतो की तो मुलीशी संबंधित प्रत्येक जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडेल. तिला त्याच्या आयुष्यात योग्य सन्मान देईन या विधीलाच कन्यादान असे म्हणतात.
हिंदू शास्त्रात असे म्हटले आहे की जेव्हा मुलीचे आई-वडील पूर्ण विधीने कन्यादान करतात तेव्हा त्यांच्या कुटुंबालाही सौभाग्य प्राप्त होते. एवढेच नाही तर उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये ही प्रथा प्रचलित आहे. तेथे मुलीचा तळहात कलशाच्या वर ठेवला जातो आणि नंतर वर आपला हात त्यावर ठेवतो आणि मंत्रांचे सोपस्कार करून कन्यादान दिले जाते म्हणजेच हा विधी कन्यादान करणे असा होतो हे दान सर्वात मोठे दान आहे. असे मानले जाते.या अंतर्गत वडील आणि मुलगी यांच्यातील भावनिक नाते दर्शविणारा हा विधी आहे. पौराणिक काळात कन्यादानात एक गाय दान केली जात होती, ज्याद्वारे मुलीने केवळ स्वतःच्या कुटुंबालाच नाही तर ती ज्या कुटुंबाकडे गेली होती त्या कुटुंबालाही सशक्त केले जाते किंवा लक्ष्मीच्या रूपाने ती दोन्ही कुटुंबाची भरभराट करते असेही मानले जाते
कन्यादान. ‘कन्या’ म्हणजे कन्या आणि ‘दान’ म्हणजे दान किंवा दान. तसे पाहिले तर एक जिवंत मुलगी किंवा जीव दान देणे असूच शकत नाही कारण ती भेटवस्तू नाही मग आपण कोणालाही भेट देतो किंवा दान करून टाकतो. आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की ह्या विधीला अजूनही निर्विवादपणे व्यवहारात सहजरीत्या समाजात कन्यादान याच नावाने ओळखले जाते. दोन कुटुंबाचा दुवा जोडणारी ही मुलगी दोन्ही कुळांचा उध्दार करत असते. तिच्या योग्य अयोग्य वागणीचा परिणाम ही दोन्ही कुटुंबात होत असतो. हिंदू शास्त्राप्रमाणे किंवा ऐताहासिक आणि पौराणिक संदर्भ घेतले तर प्रत्येक ठिकाणी स्त्री जातीचे महत्त्व अतिशय सुंदर रित्या मांडलेले गेलेले आहे त्यांचा त्याग आणि कर्तव्य यांचा मिलाप हा जगातील सर्वात उच्च कोटीचा खजिना आहे असे म्हणायला हरकत नाही.
आम्ही अभिमानाने वैदिक काळ आणि प्रथा यांची प्रशंसा करतो, परंतु जेव्हा लग्नाचा प्रश्न येतो तेव्हा केवळ स्तुती करण्याऐवजी आपण व्यवस्थेला कायम ठेवत असतो. वैदिक प्रथांशी निगडित दुर्दैवी वस्तुस्थिती अशी आहे की आपण चांगल्या प्रथा विसरलो आहोत आणि ज्यांची आज गरज नाही त्या आपण ठेवल्या आहेत. हिंदू विवाह, त्यातील विधी आणि समारंभ विविध कारणांमुळे वादग्रस्त आहेत, परंतु या ब्लॉगमध्ये, मी काही प्रमुख विधी, विशेषत: कन्यादान, आणि त्याबद्दलच्या मला वाटणाऱ्या भीतीचा उल्लेख करत आहे. कन्यादान’ किंवा वधूला निरोप’ हा एक लोकप्रिय हिंदू विधी आहे जेथे वधूचे वडील आपल्या मुलीची पाठवणी करतात. तथापि, असे म्हटले जाते की कन्यादान संकल्पनेचा वेदांमध्ये उल्लेख नाही. मग कन्यादान ही संकल्पना कुठून आली?
हे ‘मनुस्मृती’ या ग्रंथातील आहे. “मनु” या मजकुरानुसार पुरुष पालकत्व तिच्या जगण्यासाठी आवश्यक मानले गेले आहे त्यामुळे जेव्हा ती अविवाहित होती तेव्हा तिचे पालकत्व वडील असतात आणि लग्नानंतर पतीकडे जाते तेव्हां तिचे पालकत्व हे पतीकडे जाते. अर्थात दोघांचीही जबाबदारी सारखीच असते . हिंदू विवाह, त्यांचा रीतिरिवाज आणि समारंभ वैदिक कालखंडातील होते, त्या काळातील सामाजिक परिस्थितीशी सुसंगत होते. तारुण्यप्राप्तीपूर्वी मुलींची लग्ने लावली जायची आणि त्यामुळेच ‘कन्यादान’ हा विधी झाला. मुलीला तिच्या लग्नानंतर दुसऱ्या पालकाची गरज होती आणि मुलीची जबाबदारी पूर्णपणे “कन्यादान” च्या विधीनंतर ज्या कुटुंबात तिचे लग्न होत होते त्या कुटुंबावर सोयीस्कर रित्या येत होती.

आता मात्र काळ बदलला आहे. मुलीचे लग्न आता इतिहासजमा झाले आहे असे म्हणता येणार नाही परंतु आजही आपण सर्व विधी पूर्व परंपरेने एकविसाव्या शतकातही पार पाडतो आहोत आणि त्या विवाहाचे गांभीर्य किंवा आयुष्याच्या शेवटच्या टोकापर्यंत किती विवाह टिकतात याची टक्केवारी जर बघितली तर मला वाटते ५०% पेक्षा जास्त विवाह मोडले जातात आणि याची अनेक कारणे आहेत. तो आजचा विषय नाहीच. कारण आपण आज समाजात पुरुष – स्त्री समानता, मुलींचा शिक्षणाचा हक्क, संपत्तीत वाटा उचलण्याचा अधिकार आणि सर्व काही! हे आवश्यक मानताना आपण संस्कार संतुलन राखण्याबद्दल किती वेळा प्रयत्न करतो हाही एक प्रश्न ?असमानतेच्या मूळ कारणांना आपण किती वेळा लक्ष्य करतो? विशेषत: हिंदू वातावरणातील विवाह म्हणजे सध्याच्या जगात कोणतेही व्यावहारिक हेतू नसलेले विधी आहेत परंतु तरीही त्यांच्याशी एक मजबूत नैतिक आणि भावनिक घटक संबंधित आहे. आज हिंदु धर्मात असणाऱ्या सर्व विधिंचा अभ्यास हा मोठा आहे, प्रत्येक विधीला कारण आहे , किंवा त्याचा एक विशिष्ट अर्थ आहे ते मानलेच पाहिजे यात दुमत नाहीच परंतु बदलत्या परिस्थितीत या विधी बरोबर विवाह हा संस्कारच लोप होत चालल्याची भावना वाढीस लागली आहे. एकत्र कुटुंब व्यवस्था विखुरल्यामुळे याचे दूरगामी परिणाम दिसत आहेत. आपण जर परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत असू तर आपल्यातील पारंपारिक भूमिकां, रूढी, परंपरा आणि संस्कृती याचा योग्य रित्या समेट घडवून आणता आला पाहिजे फक्त त्यावर व्यवहारिक दृष्ट्या प्रश्नचिन्ह उपस्थित करून चालणार नाही तर साऱ्या प्रथा परंपरा पळताना सध्याच्या व्यवसायिक जीवनात विवाह ही मुळ संकल्पना रुजावावी लागेल. फक्त कन्यादान या प्रथेचा विचार करावयाचा झाल्यास ही हिंदू परंपरा टिकवायची असेल तर प्रथम सारा विस्कटलेला समाज संतुलित करावा लागेल. मुलगी ही वस्तू नाहीच ती दान दिली म्हणजे आपली जबाबदारी संपली. कन्यादान हे धार्मिक कर्मकांड जरी असले तरी पुरोगामी विचारांचा वारसा जपताना त्याच्या आत्मियतेला जो वारंवार धक्का लागताना आपण पाहतो तो थांबायलाच हवा. सद्य परिस्थितीत वाढलेले घटस्फोट जेव्हां २% च्या खाली येतील तेव्हांच कन्यादान हा विधी सफल झाला असे म्हणता येईल. अन्यथा आता तरी हा विधी फक्त एक सोपस्कार म्हणून केला जातो असे म्हणावे लागेल

♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️

बाबाजी हुले , नवी मुंबई

Previous articleनितीनभाऊ दिनकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप
Next articleआंबेडकरांचे शैक्षणिक विचार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here