Home जालना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात शिक्षक व पालकांची महत्त्वपूर्ण भूमिका ः डॉ. बाबासाहेब वाघ

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात शिक्षक व पालकांची महत्त्वपूर्ण भूमिका ः डॉ. बाबासाहेब वाघ

24
0

आशाताई बच्छाव

IMG_20240224_073518.jpg

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात शिक्षक व पालकांची महत्त्वपूर्ण भूमिका ः डॉ. बाबासाहेब वाघ
जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) ः  जालना येथील कल्पवृक्ष फाउंडेशनद्वारा संचलित गोल्डन ड्रीम इंग्रजी शाळेच वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमप्रसंगी    हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन डॉ. बाबासाहेब वाघ यांच्याहस्ते करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी उपस्थित शिक्षक – पालक व विद्यार्थी यांना संबोधित केले.
जे. एस. महाविद्यालय जालनाचे डॉ. बाबासाहेब वाघ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षक व पालकांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. विद्यार्थी आपले आई-वडील व शिक्षकांचे अनुकरण करत असतात त्यामुळे पालक व शिक्षकांनी अत्यंत जबाबदारीने वागणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांवर बालवयातच योग्य संस्कार होत असतात. आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचे कार्य गोल्डन ड्रीम शाळेच्या माध्यमातून होत असल्याचे डॉ. वाघ यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना डॉ. वाघ म्हणाले की, अलीकडील काळात मोबाईलच्या अती वापरामुळे शिक्षणाचा दर्जा खालावला आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा गोल्डन ड्रीम शाळेने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास महत्त्वाचा मानुन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास साधण्यासाठी व चांगले आदर्श विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी संपूर्णपणे स्वीकारुन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी सतत शाळेत नवनवीन उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीत पालकांचा बराच वेळ मोबाईलवर सोशल मीडियावर खर्च होत आहे. हि बाब अत्यंत गंभीर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here