Home Breaking News   *इचलकरंजी मधे दुकानात घुसला मोठा ट्रक*

  *इचलकरंजी मधे दुकानात घुसला मोठा ट्रक*

238

*इचलकरंजी मधे दुकानात घुसला मोठा ट्रक*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी शहरात सांगली रोडवरील फाँर्चून प्लाझा जवळ रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटून ब्युटी पार्लर शेजारच्या गुरूकृपा इलेक्ट्रॉनिक दुकानात घुसल्याने मोठ्या प्रमाणात दुकानाचे नुकसान झाले आहे.
दुकान बंद असल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही
अचानक झालेल्या प्रकारामुळे नागरिकांनी मोठी गर्दी केली.
रस्त्यावरून येत असतानाच या मोठया ट्रकने एका दुचाकी स्वाराला देखिल उडवल्याने दुचाकीचा चक्काचुरा झाला आहे. दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आला आहे.
सांगली इचलकरंजी रोड वरती मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते , अचानक मोठा आवाज झाल्याने
घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती . नागरिकांनी ट्रकचालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले , घटनास्थळी पोलीसांनी घडलेल्या प्रकारचा पंचनामा करून पुढील तपास करत आहेत.

Previous article*मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे लाभ देण्याचा निर्णय मागे*
Next articleविद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा. खा. प्रताप पाटील चिखलीकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.