Home अमरावती गजाननराव काळमेघे यांनी दिले शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन

गजाननराव काळमेघे यांनी दिले शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन

28
0

आशाताई बच्छाव

IMG_20240222_204859.jpg

चांदूरबाजार,(मयुर खापरे )  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांना १४ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे भेटुन शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याबाबत व विविध समस्याबाबत निवेदन भाजपा किसान मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य गजाननराव काळमेघ यांनी दिले.

शेतकऱ्यांच्या विविध मांगण्या घेऊन भाजपा किसान मोर्चा चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गजाननराव काळमेघ यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांना १४ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे भेटुन सक्तीची कर्जवसुली बंद करुन शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी व शेतीसाठी पूर्णवेळ व पुर्णदाबाने वीजपुरवठा करण्यात यावा, मागील वर्षीचा प्रलंबित दुष्काळ निधी व यावर्षीचा दुष्काळ निधी शेतकऱ्यांना त्वरीत देण्यात यावा ,वन्यप्राण्याकडून होणाऱ्या शेतातील पिकांचे नुकसान टाळन्यासाठी सरकारने उपाययोजना कराव्यात किवा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी व पिकविम्यात होणारी शेतकऱ्यांची फसवणुक बंद करून विम्याचा योग्य लाभ देणारी योजना अंमलात आणावी.
महत्वाचे म्हणजे २००८ पूर्वीचे ५ एकराच्या वरील वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याबाबत व तसेच २०१४ व २०१९ मध्ये सुद्धा वंचीत राहलेल्या थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत कर्ज माफी मिळण्यात यावी व ह्या सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या निकाली काढुन शेतकऱ्यांना मदत करावी ही विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना गजाननराव काळमेघ यांनी केली.

Previous articleबैठक व नवनियुक्ती पदाधिकारी सोहळा संपन्न… छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र
Next articleमहानगरपालिका विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन- हेमंत तांबे सर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here