Home अमरावती अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव येथे ५२ हजार ५०० रुपयाचा गांजा जप्त, पोलिसांची संयुक्त...

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव येथे ५२ हजार ५०० रुपयाचा गांजा जप्त, पोलिसांची संयुक्त कारवाई.

26
0

आशाताई बच्छाव

IMG_20240222_195704.jpg

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव येथे ५२ हजार ५०० रुपयाचा गांजा जप्त, पोलिसांची संयुक्त कारवाई.
————-
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती. (अंजनगाव)
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथून सलग दुसऱ्या दिवशी ३ किलो ५०९ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा व अंजनगाव सुर्जी पोलिसांनी २१ फेब्रुवारी रोजी ही संयुक्त कारवाई केली. गोपाल उत्तमराव फुसे वय 3७ माळीपुरा अंजनगाव सुर्जी असे अटक केलेल्या आरोपी कांद्याच्या नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक २१ फेब्रुवारी रोजी पेट्रोलिंग करीत असता अंजनगाव सुर्जी येथील गोपाल फुसे हा अवैधरित्या विक्रीसाठी गांजा घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्राप्ती माहितीची शहनीश्या करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंजनगाव सुर्जी ते आकोट रोड वरील कचरा डेपो समोर सापळा रचला. सापळ्या दरम्यान आरोपीची झटके घेतले असता त्याच्या जवळील बागेमध्ये५२हजार५०० रुपयाचा गांजा, 1000 रुपयाची बॅग व मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपी विरुद्ध अंजनगाव सुर्जी पोलिसा एनडीपीएस कायद्याने गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेच्या प्रमुख किरण वानखडे अंजनगाव सुर्जी येथील ठाणेदार प्रकाश अहिरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक संजय शिंदे अमलदार त्र्यंबक मनोहर ,सय्यद अजमत, निलेश डोंगरे, जयसिंग चव्हाण ,शुभम मार्कंडे, यांनी केली. गांजा तस्करी करणाऱ्याला तसेच मंगळवारी देखील कारवाई करण्यात आली. स्थानिक गणेश शाखेच्या पथकाने 20 फेब्रुवारी रोजी अंजनगाव सुर्जी येथील त्याच्याकडून ३ किलो ८६८ ग्राम गांजा व अन्य साहित्य असा ६६ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संतोष साहेबराव गुंजावळे वय२९रा. वानखडे पेठ अंजनगाव सुर्जी असे गांजा तस्कर यांचे नाव आहे. संतोष गुंजावडे हा विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा घेऊन अंजनगाव सूर जिल्हा येत असल्याची माहिती वस्तीवरील असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या मिळाली होती.

Previous articleकेंद्र व राज्य सरकार आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या कल्याणासाठी सदैव पाठीशी
Next articleमराठी राजभाषा दिन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here