Home अमरावती लोककला, परंपरा जोपासण्यासाठी अमरावती जिल्ह्यात ‘महासंस्कृती महोत्सवा’चे आयोजन

लोककला, परंपरा जोपासण्यासाठी अमरावती जिल्ह्यात ‘महासंस्कृती महोत्सवा’चे आयोजन

24
0

आशाताई बच्छाव

IMG_20240217_170821.jpg

लोककला, परंपरा जोपासण्यासाठी अमरावती जिल्ह्यात ‘महासंस्कृती महोत्सवा’चे आयोजन

आदिवासी, लोककलांसाठी मिळणार व्यासपीठ; नागरिकांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

गजानन जिरापुरे
जिल्हा प्रतिनिधी अमरावती

अमरावती, दि. 18: पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हा प्रशासनाच्या वतीने अमरावती येथे महासंस्कृती महोत्सव सायन्स कोअर मैदान येथे दि. 18 ते 22 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात आदिवासी परंपरा, संस्कृती व लोककला सादर करण्यासाठी स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या संधीचा स्थानिक कलाकारांनी लाभ घ्यावा. तसेच नागरिकांनीही या पाच दिवशीय महोत्सवाच्या मेजवाणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे महासंस्कृती महोत्सवा संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत हेाते. मनपा आयुक्त देवीदास पवार, जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, तसेच पत्रकार बांधव आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कटियार म्हणाले की, पाच दिवशीय सांस्कृतिक महोत्सवामध्ये आदिवासी समाजातील कोलाम, गोंड, प्रधान आदी जातींच्या लुप्त होत चाललेल्या परंपरा, लोककलांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. तसेच स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या संधीचा स्थानिक कलाकारांनी लाभ घ्यावा. तसेच नवीन पीढीला या महोत्सवाच्या माध्यमातून परपंरा व संस्कृती जोपासना करण्यास मदत होणार असून नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आस्वाद घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

रविवार दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता स्थानिक कलाकार समूहाव्दारे ढोल ताशा पथकांचा कार्यक्रम होईल. सायंकाळी 6 ते 7.30 वाजता उद्घाटन सोहळा. रात्री 7.30 ते 10 वाजेपर्यंत सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांचे मराठी आणि हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर करतील. सोमवार दि. 19 फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराज जयंती निमित्य स्थानिक कलाकारांव्दारे पोवाडा आणि इतर कार्यक्रम सादर करतील. सायंकाळी 7.30 ते 10 वाजेपर्यंत गर्जा महाराष्ट्र संगीत कार्यक्रम हृषिकेश रानडे आणि सहकलाकार सादर करतील. मंगळवार दि. 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 ते 7.30 वाजता स्थानिक कलाकारांव्दारे जागर लोक कलेचा कार्यक्रम होईल. यामध्ये दंडार, एकांकिका, देशभक्तीपर व मनोरंजनात्मक गाणी सादर केल्या जाईल. रात्री 7.30 ते 10 वाजेपर्यंत महाराष्ट्राची लोकधारा महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारा कला अविष्काराचा कार्यक्रम होईल.
बुधवार दि. 21 फेब्रुवारी रोजी सांयकाळी 5 ते 7.30 वाजता स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमात मेळघाट नृत्य, कोरकू, लोकनृत्य, भारूड पारंपारिक कला सादर केल्या जाईल. तर सांयकाळी 7.30 ते 10 वाजेपर्यंत मराठी व हिंदी गाण्याचा संगीत कार्यक्रम सुप्रसिद्ध गायक बेला शेंडे सादर करतील. गुरुवार दि. 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित महानाट्य ‘संविधान’ सादर होईल.

 

महोत्सवाच्या ठिकाणी दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्थानिक कलाकारांचे विविध बहारदार कार्यक्रम सादर होतील. तसेच शासनाच्या विविध विभागाचे स्टॉल लावण्यात येणार आहे. विशेष आकर्षण म्हणून बचतगटांचे प्रदर्शनी व खाद्य संस्कृतीचेही आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवासाठी प्रवेश नि:शुल्क असून नागरिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी केले आहे.

Previous articleनायगाव जुने शाळेचे क्रीडा स्पर्धेत यश
Next articleकेंद्र सरकारच्या विरोधात विरोधकांचा एल्गार ! निवडणूकांमध्ये भाजपचे सरकार उलथवून टाकण्याचे आवाहन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here