Home उतर महाराष्ट्र नायगाव जुने शाळेचे क्रीडा स्पर्धेत यश

नायगाव जुने शाळेचे क्रीडा स्पर्धेत यश

103

आशाताई बच्छाव

IMG_20240217_165853.jpg

नायगाव जुने शाळेचे क्रीडा स्पर्धेत यश
श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी)- तालुक्यातील नायगाव जुने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी केंद्रस्तरिय व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळविले आहे.अनिल इन्द्रभान गायकवाड(इ.३री) याने केंद्रस्तरिय क्रीडा स्पर्धेत लहान गट मुले उंच उडी व धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.तसेच त्याने उंच उडी स्पर्धेत तालुक्यात दुसरा क्रमांक पटकाविला.कु.समिक्षा सुभाष तुपे(इ.४थी)हिने लहान गट मुली लांब उडी स्पर्धेत केंद्रात तिसरा क्रमांक तर कु.पुजा रमेश भवार(इ.४थी)हिने लहान गट मुली धावणे स्पर्धेत केंद्रात तिसरा क्रमांक पटकाविला.या यशाबद्दल विद्यार्थ्यांचा माता पालक मेळाव्यात सरपंच राजाराम राशिनकर,बापूसाहेब लांडे, संपतनाना लांडे, आरोग्यामित्र सुभाष गायकवाड,प्रमोद शेजुळ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश लांडे, पोलीस पाटील राजेंद्र राशिनकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक संतोष वाघमोडे व शिक्षिका सुजाता सोळसे यांचे मार्गदर्शन लाभले.

Previous articleमहिलांच्या स्वावलंबनासाठी मोरया फाउंडेशनने पुढाकार घ्यावा- शालिनीताई विखे
Next articleलोककला, परंपरा जोपासण्यासाठी अमरावती जिल्ह्यात ‘महासंस्कृती महोत्सवा’चे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.