Home उतर महाराष्ट्र जेऊर कुंभारी येथे प्रथम महिला आमदार मा.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत माता...

जेऊर कुंभारी येथे प्रथम महिला आमदार मा.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत माता रमाई जयंती उत्सव साजरा

34
0

आशाताई बच्छाव

IMG_20240209_064634.jpg

जेऊर कुंभारी येथे प्रथम महिला आमदार मा.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत माता रमाई जयंती उत्सव साजरा.                           कोपरगाव दिपक कदम 

कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार मा.सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत व आर पी आय चे प्रदेश सचिव दिपकराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जेऊर कुंभारी,संजयनगर येथे आर पी आय शाखा जेऊर कुंभारी व भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे वतीने आयोजित माता रमाई जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. महिलांच्या आग्रहास्तव मा.सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी सदर जयंती उत्सवाचे निमंत्रण स्वीकारून सदर कार्यक्रमासाठी उपास्थित राहिल्याबद्दल सर्व महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.महिलांचे वतीने ताईसाहेबांचा जाहीर सत्कार करून स्वागत करण्यात आले.सदर प्रसंगी पंडितराव भारुड सर यांची कोपरगाव ओद्योगिक वसाहतीच्या संचालक पदी नियुक्ती झालेबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सौ. शेख यांनी हज यात्रा पूर्ण केलेबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सह.साखर कारखान्याचे संचालक श्री.बाळासाहेब वक्ते, श्री सतीश आव्हाड, संघटनेचे मार्गदर्शक श्री.भास्करराव वाकोडे, स्मारक समिती उपाध्यक्ष श्री.बाबुराव काकडे, पंचायत समितीचे माजी सभापती श्री. शिवाजीराव वक्ते, माजी संचालक श्री.मधुकरराव वक्ते,भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष श्री.सुधाकर वक्ते आर पी आय राहता तालुका संघटक रमेश कसबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रम प्रसंगी शेकडो समाजबांधव व ग्रामस्थ उपस्थित असून महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे उपाध्यक्ष दावीद धीवर , सागर जगताप,कार्याध्यक्ष सुमित पगारे, संघटक निलेश शिंदे,अध्यक्ष सागर गायकवाड,अजय गोरसे,रवी पवार,सचिन गायकवाड,बाबुराव शिंदे, विजय पवार, सुरेश चव्हाण,स्वप्नील भालेराव,अमोल चव्हाण,आदेश माळी,सम्राट बनसोडे, गौतम गायकवाड, अवि पगारे,आकाश पगारे, आदेश भवर,वैभव काकडे,सौरव गायकवाड,अमोल काकडे सोमेश्वर गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्तविक ,सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे संस्थापक प्रदिप गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे शेवटी भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

Previous articleपरळी तालुक्यातील टोकवाडी येथील आकाश रोडेचा खून; नातेवाईकांचा आरोप
Next articleजिजाऊ ब्रिगेड देगलुर तर्फे गुणवंतांचा सत्कार सोहळा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here