Home बीड परळी तालुक्यातील टोकवाडी येथील आकाश रोडेचा खून; नातेवाईकांचा आरोप

परळी तालुक्यातील टोकवाडी येथील आकाश रोडेचा खून; नातेवाईकांचा आरोप

126

आशाताई बच्छाव

IMG_20240209_064154.jpg

परळी तालुक्यातील टोकवाडी येथील आकाश रोडेचा खून; नातेवाईकांचा आरोप

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/परळी दि:०८  वीटभट्टीवरील पाण्याच्या टँकरवर चालक म्हणून कामाला असलेल्या ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह रात्री टँकरच्या चाकाखाली आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. चालक सकाळी डब्बा घेऊन कामावर गेला होता. रात्री उशिरापर्यंत घरी आला नसल्याने त्याचे नातेवाईक त्याचा शोध घेत होते. मात्र सदरील चालकाचा मृतदेह चाकाखाली आढळून आल्याने हा अपघात आहे की घातपात ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. चालकाचा खून केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
आकाश सुरेश रोडे वय 30 वर्षे रा. टोकवाडी हा वीटभट्टी वरील पाण्याच्या टँकरवर चालक म्हणून कार्यरत होता. काल सकाळी तो घरी येऊन डब्बा घेऊन कामावर गेला होता. रात्री सात वाजेपर्यंत तो घरी परतला नसल्याने त्याच्या घरच्यांनी सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली मात्र तो उशिरापर्यंत आणून आला नाही. रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान त्याचा मृतदेह वीटभट्टीवरील टँकरच्या पुढच्या चाकाखाली आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. चालकाचा अपघात झाला की त्याला ठार मारण्यात आले, असा प्रश्न उपस्थित होत असून आकाश रोडेचा खून करण्यात आल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. पोलिसांनाही या घटनेबाबत संशय असून हा घातपात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या दरम्यान माझा मुलगा आकाश रोडे याचा टोकवाडी येथे मृतदेह आढळला असून त्याचा खूनच करण्यात आला. आम्हाला कसलीही कल्पना न देता त्याचा मृतदेह रुग्णालयात आणला असून याप्रकरणी दोषींविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी मयताचे वडील सुरेश रोडे यांनी पोलिसांकडे केली आहे.