Home वाशिम आरटीआय प्रकरणात दिशाभूल केल्याप्रकरणी ग्रामसचिवावर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी

आरटीआय प्रकरणात दिशाभूल केल्याप्रकरणी ग्रामसचिवावर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी

256

आशाताई बच्छाव

IMG_20240208_195425.jpg

आरटीआय प्रकरणात दिशाभूल केल्याप्रकरणी ग्रामसचिवावर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी
सामाजीक कार्यकर्ते प्रमोद भगत यांचा उपोषणाचा इशारा
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागीतल्यानंतर जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसचिवाने चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिल्याप्रकरणी संबंधीत ग्रामसचिवावर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी मंगरुळपीर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भगत यांनी केली आहे. ८ फेब्रुवारीला जि.प. मुख्य कार्यपालन अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाव्दारे त्यांनी पंचायत समिती कार्यालयावर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
निवेदनात नमूद आहे की, माहिती अधिकार कायद्याव्दारे अर्ज करुन शासकीय माहिती मिळविण्याचा अधिकार जनतेला आहे. मात्र संबंधीत अधिकारी हा कायदा सर्रास पायदळी तुडवित असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात प्रमोद भगत यांनी १६ जानेवारी रोजी आरटीआयनुसार मंगरुळपीर तालुक्यातील ग्रामपंचायत जांब शहापुर जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसचिव कु. सिमा सुर्वे यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. तसेच सदर माहिती टपालव्दारे पाठवावी असेही नमूद करण्यात आले होते. असे असतांना जनमाहिती अधिकार्‍यांनी माहितीचे निरिक्षण व अवलोकनासाठी पत्र दिले. या पत्रानुसार प्रमोद भगत हे
वृत्त संकलनासाठी ग्रा.पं. जांब शहापुर कडे दि. १६/०१/२०२४ रोजी माहिती अधिकार कायदा २००५ अन्वये अर्ज केला होता परंतु कु. सिमा सुर्वे ग्राम सचिव जन माहिती अधिकारी यांनी टपालव्दारे माहिती मिळावी हे अंतर्गत नमुद असतांनाही माहितीचे निरीक्षण व अवलोकनासाठी पत्र दिले. सदर पत्रानुसार भगत हे माहिती अवलोकनासाठी गेले असता तेथे त्यांच्यासोबत अरेरावीची भाषा करुन चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दाखविण्यात आली. तसेच माहिती हवी असल्यास प्रती पान ४ रुपये प्रमाणे एकूण ५३३६ रुपये शुल्क भरणा करावा असे भगत यांना सांगण्यात आले. आरटीआय कायद्यानुसार प्रत्येक लिखीत किंवा छायांकीत प्रतिसाठीप्रति २ रुपये शुल्क असा लिखीत नियम असतांनाही अवाजवी व नियमबाहय शुल्क आकारणी करुन अपिलकर्त्याकडुन पैसै वसुल करण्याचा हा नियमबाहय प्रकार जनमाहिती अधिकारी कु. सिमा सुर्वे ग्राम सचिव यांचेकडुन होत असल्याचा आरोप भगत यांनी केला आहे. या प्रकरणी चौकशी करुन सबंधीत जनमाहिती अधिकार्‍यावर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा आपण मंगरुळपीर पंचायत समिती कर्यालयासमोर आमरण उपोषण करु असा इशारा भगत यांनी जि.प. प्रशासनाला दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.

Previous articleशिक्षक दीपक कोल्हे यांचे निधन
Next articleपरळी तालुक्यातील टोकवाडी येथील आकाश रोडेचा खून; नातेवाईकांचा आरोप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.