Home जालना प्रस्थापितांची भीती मनातून काढून टाका ; शेतकऱ्याची अडवणूक होऊ देणार नाही

प्रस्थापितांची भीती मनातून काढून टाका ; शेतकऱ्याची अडवणूक होऊ देणार नाही

23
0

आशाताई बच्छाव

IMG_20240208_184645.jpg

प्रस्थापितांची भीती मनातून काढून टाका ; शेतकऱ्याची अडवणूक होऊ देणार नाही

सतीश घाटगे : बोंधलापुरीत भाजपाच्या शाखा उदघाटनाला उत्स्फुर्द प्रतिसाद  

घाटगे साहेबांच्या नेतृत्वाखाली बोंधलापुरीत भाजपाचा झंझावात

घनसावंगी/जालना दिलीप बोंडे: तालुक्यातील बोंधलापुरीत बुधवारी समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या जल्लोषात भाजपाच्या शाखेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी गावातील असंख्य युवकांनी सतीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

प्रस्थापितांची भीती मनातून काढून टाका, उसाचे राजकारण संपविण्यासाठी मी आलोय, बोंधलापुरीतील एकाही शेतकऱ्याची, युवकाची अडवणूक होऊ देणार नाही. त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. असे सतीश घाटगे यांनी यावेळी उपस्थितीत गावकऱ्यांना सांगितले. तसेच गावातील शेतकऱ्यांच्या उसाचे टीपरुही शेतात उभे राहू देणार नाही. पंधरा दिवसात शेतकऱ्यांचा ऊस नेणार, असा शब्द दिला.

या शाखा उद्घाटन सोहळ्यास युवा मोर्चाचे अध्यक्ष शिवाजीराव कंटुले, जिल्हा सरचिटणीस रामेश्वर माने, जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर गरड,  राजेंद्र छल्लारे, तालुका उपाध्यक्ष कृष्णा सागडे, शिवाजीराव पवार, बाबासाहेब हरबक, महादेव चिमणे, सतीश केसकर, शरद खरपडे, शरद खराबे, दत्ता पाटील मांगदरे, जगन्नाथराव काकडे, विशाल बोरसे, हरीश राठोड, राजकुमार उगले, शेख चांद शेख लतीफ, भगवानराव माळोदे, ओमप्रकाश माळोदे, लक्ष्मणराव काटे, दामोदर कुलकर्णी, आत्माराम मोरे, राजू किडे, चक्रधर धानोरे, रमेश मुंडे, सचिन मोरे, दीपक किडे, नितीन कुऱ्हे, प्रवीण कुलकर्णी, परमेश्वर सोनवणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Previous articleओबीसी एल्गार सभेची पोस्ट टाकणार्‍या शिक्षकावर कारवाई; मग मराठा सभेच्या पोस्ट करणार्‍या 26 शिक्षकांना अभय का?
Next articleशिक्षक दीपक कोल्हे यांचे निधन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here