Home जालना ओबीसी एल्गार सभेची पोस्ट टाकणार्‍या शिक्षकावर कारवाई; मग मराठा सभेच्या पोस्ट करणार्‍या...

ओबीसी एल्गार सभेची पोस्ट टाकणार्‍या शिक्षकावर कारवाई; मग मराठा सभेच्या पोस्ट करणार्‍या 26 शिक्षकांना अभय का?

129

राजेंद्र पाटील राऊत

IMG_20240208_184233.jpg

ओबीसी एल्गार सभेची पोस्ट टाकणार्‍या शिक्षकावर कारवाई; मग मराठा सभेच्या पोस्ट करणार्‍या 26 शिक्षकांना अभय का?

ओबीसी समाज समन्वय समितीचा आरोप; सीईओ,शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): ओबीसी एल्गार सभेची पोस्ट फेसबुकवर पोस्ट केल्या प्रकरणी ईश्वर गाडेकर या शिक्षकावर जी कारवाई जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी,शिक्षणाधिकारी यांनी केली;तशीच कारवाई मराठा आंदोलनाची सोशल मीडियावर 50 – 50 पोस्ट करणार्‍या 26 शिक्षकांवर का केली नाही? प्रशासनातील अधिकारी मराठा समन्वयक यांच्या दबावाखाली येऊन जातीयवाद करीत आहे,असा गंभीर आरोप ओबीसी समाज समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला.
येथील ओबीसी समाज समन्वय समितीच्या कार्यालयात बुधवारी ( दि.7 ) पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जिल्हा समन्वयक अशोक पांगारकर, दीपक बोराडे ,प्रा.सत्संग मुंडे,बळीराम खटके,राजेंद्र राख,कैलास फुलारी यांची उपस्थिती होती.  यावेळी बोलता दीपक म्हणाले, अंबड येथील ओबीसी एल्गार सभेची पोस्ट फेसबुकवर पोस्ट शिक्षक ईश्वर गाडेकर यांनी केली होती. याबाबत मराठा क्रांती समन्वयक यांनी तत्कालीन शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांच्याकडे तक्रार केली. त्यावरून गाडेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या दालनात गाडेकर आणि त्यांच्या शिक्षिका पत्नी यांना उभे करून अपमानास्पद वागणूक देण्यात आली आणि जाहीर माफी मागायला लावली. दरम्यान,मी अशाच पद्धतीने मराठा आंदोलनाची सोशल मीडियावर तब्बल 50 – 50 पोस्ट करणार्‍या 26 मराठा शिक्षकांची तक्रार शिक्षणाधिकारी आणि सीईओ कडे केली होती. मात्र, यावर या अधिकार्‍यांनी कोणताही कारवाई केली नाही. उलट याबाबत सुनावणी घेण्याची नोटीस काढली .

Previous articleबनावट कागदपत्राच्या आधारे भूखंडाची विक्री. खरेदीवर उभी केली तोतीया महिला! गुन्हा दाखल.-
Next articleप्रस्थापितांची भीती मनातून काढून टाका ; शेतकऱ्याची अडवणूक होऊ देणार नाही
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.