Home भंडारा वाढदिवसाला रक्तदान, वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जोपासावी- जी. एस. खरडे

वाढदिवसाला रक्तदान, वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जोपासावी- जी. एस. खरडे

86
0

आशाताई बच्छाव

IMG_20240207_214106.jpg

वाढदिवसाला रक्तदान, वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जोपासावी- जी. एस. खरडे

वाढदिवसानिमित्त वृक्ष देऊन वृक्षारोपण

संजीव भांबोरे
भंडारा )जिल्हा प्रतिनिधी )मानवानी स्वत:च्या स्वार्थापोटी वृक्षांची बेसुमार कत्तल केली आहे. त्याचा परिणाम ऋतू चक्रात होत असतो. यामुळे ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या समस्यांना समोर जावे लागत आहे. आणि कोरोना (कोव्हीड) मध्ये कित्येकांना ऑक्सीजन अभावी मृत्युमुखी पडावे लागले. तेव्हा वृक्षाचे महत्व सर्वांना कळले आहे. म्हणून पुथ्वीवर जगणाऱ्या प्रत्येक मानवाने आपल्या वाढदिवसाला रक्तदानाबरोबर वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जोपासावी असे प्रतिपादन भंडारा जिल्हा कारागृहाचे प्रभारी अधिक्षक जी. एस. खरडे यांनी केले.
ते भंडारा येथील समीर वर्ल्ड कॉम्पुटर एज्यूकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर यांच्या‌ वाढदिवसानिमित्त भंडारा जिल्हा कारागृहातील सार्वजनिक वाचनालयात विविध लेखकांची पुस्तके वितरण व वृक्षारोपण कार्यक्रमात बोलत होते.
त्यावेळी भंडारा जिल्हा कारागृह प्रभारी अधिक्षक जी. एस. खरडे, तुरुंगाधिकारी संदिप क्षिरसागर,‌ चला नदीला जाणूया उपक्रमाचे जिल्हा समन्वयक अविल बोरकर, सुभेदार कृष्णा बाभरे, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, समीर वर्ल्ड कॉम्पुटर एज्युकेशनचे संचालक समीर नवाज, यशवंत बिरे, जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल टेंभुर्णे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कारागृहाच्या परिसरात केलेले वृक्षारोपण हे तुमची सदैव आठवण करून देत जाणार तसेच वाचनालयाला भेट दिलेल्या पुस्तकांचा उपयोग कैद्यांना नेहमीच होत राहिलं असल्याचे मत तुरुंगाधिकारी संदिप क्षिरसागर यांनी व्यक्त केले.
मानव हा बुध्दीमान प्राणी आहे. तो सर्वांच्या कल्याणाकरिता वेळ वाढतो. मात्र स्वत:च्या आरोग्यासाठी वेळ देत नाही. म्हणून माणसाला चांगले आयुष्य जगायचे असल्यास रोज योग प्राणायाम करावे. असे मत चला नदीला जाणूया उपक्रमाचे जिल्हा समन्वयक अविल बोरकर यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समीर नवाज यांनी केले तर उपस्थितांचे आभार यशवंत बिरे यांंनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शिपाई प्रभाकर वैरागडे, स्वप्निल भोयर, यशवंत थोटे, विवेक चटप, संस्कार केजरकर, प्राची चटप, अर्चना ढेंगे, सहकार्य केले.

Previous articleतुमसर येथे मातोश्री माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
Next articleमानेगाव /सडक येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here