Home उतर महाराष्ट्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे

30
0

आशाताई बच्छाव

IMG_20240205_180101.jpg

श्रीरामपुर (प्रतिनिधी दिपक कदम तालुका प्रतिनिधी)- ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे ओबीसी समाजाच्या ३५० जातीवर हा अन्याय असुन या आरक्षणास आमची हरकत असल्याचे लेखी पत्र श्रीरामपुर तालुक्यातील ओबीसी समाजाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले या वेळी बोलताना समता परिषदेचे नेते चंद्रकांत झुरगे म्हणाले की मंडल आयोगाच्या शिफारशी नुसार आम्हाला आरक्षण मिळालेले आहे या आरक्षणात असलेला अठरा पगड जातीचा समाज गोर गरीब दिन दलीत कुटुंबाचा समावेश आहे त्यामुळे ओबीसी समाजाच्या कोट्यातून आरक्षण दिल्यास सर्वात मोठ्या असणाऱ्या ओबीसी समाजावर अन्याय होईल.तसेच मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी तयार करण्यात आलेली प्रश्नावली चुकीची व आक्षेपार्ह असुन सगेसोयरे या बाबत काढलेला आदेशही चुकीचा असल्याचे झुरंगे म्हणाले या वेळी नायाब तहसीलदार व्ही आर कल्हापुरे यांनी निवेदन स्विकारले त्यानंतर ओबीसी समाजाच्या वतीने आमदार लहु कानडे यांनाही निवेदन देण्यात आले त्या वेळी बोलाताना आमदार लहु कानडे म्हणाले की तिन चाकाचे हे शासन सर्व सामान्यांना मुलभुत गरजांच्या प्रश्नापासुन दुर ठेवण्यासाठी ही जातीयवादाची खेळी खेळत आहे सर्व सामान्य नागरीकांना आपल्या हक्कापासुन वंचित ठेवण्यासाठी हे जातीयवादाचे विष कालवले जात आहे सुज्ञ मतदारांनी वेळीच सावध व्हावे असेही ते म्हणाले या वेळी दत्तात्रय साबळे बेलापुरचे माजी सरपंच भरत साळूंके यांनीही मनोगत व्यक्त केले या वेळी सुभाष गायकवाड विठ्ठल दुधाळ वासंत लिंगायत सुनिल ससाणे अनिल मुंडलीक अशोक शिरसाठ, विजयराव कुदळे, दत्तात्रय साबळे, राजेंद्र सातभाई राजेंद्र टेकाडे मारुती राशिनकर शिवाजी जेजुरकर प्रकाश कुर्हे कलेश सातभाई, शरद कळमकर, रामदास शिंदे, संचीत गिरमे, विवेक गिरमे, तुकाराम बिरदौडे, जाकीर शेख एकनाथ नागले अशोक गवते फैय्याज बागवान दिपक गीरमे किरण बोरावके बाबासाहेब ढगे आदिसह तालुक्यातील ओबीसी बांधव उपस्थित होते

Previous articleमातीमध्ये घाम गाळणाऱ्यांचा सत्कार ही प्रेरणादायी गोष्ट
Next articleशासकीय रुग्णालय परिचारिका संघटनेची नविन कार्यकारिणी जाहीर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here