Home नाशिक लासलगाव महावीर महाविद्यालयाचा रा.से.यो शिबिरात राष्ट्रीय बालिका दिन आनंदात साजरा

लासलगाव महावीर महाविद्यालयाचा रा.से.यो शिबिरात राष्ट्रीय बालिका दिन आनंदात साजरा

79
0

आशाताई बच्छाव

IMG_20240128_081128.jpg

लासलगाव महावीर महाविद्यालयाचा रा.से.यो शिबिरात राष्ट्रीय बालिका दिन आनंदात साजरा

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड (नाशिक) प्रतिनिधी

श्री महावीर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव यांचे रा. से. यो. अंतर्गत हिवाळी
श्रमसंस्कार शिबिर दि २३ जाने २०२४ ते २९ जाने २०२४ दरम्यान थेटाळे येथे राबवले जात आहे. सलग दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांवर “श्रमसंस्कार” व्हावे यासाठी “श्रमदान शिबिर” राबवले. त्या अंतर्गत गावातील ” मुख्य रस्ता व मुख्य चौक साफसफाई करणे” ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली. त्यात विद्यार्थ्यांनी सेवाभाववृत्तीने आपल्या उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी रा.से.यो अंतर्गत व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशीचे व्याख्यान पुष्प प्रा. रविंद्र राऊत यांनी सजवले. त्यांनी ” लोकसंख्या वाढ व त्याचे दुष्परिणाम ” या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा थेटाळे ग्रामपंचायत सदस्या सोनालीताई शिंदे यांनी ” बालिका दिनानिम्मित मुलगी वाचवा ,मुलगी शिकवा” या विषयावर विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी थेटाळे येथील आशा सेविका प्रमिलाताई शिंदे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्तविक रा. से. यो. ची स्वयंसेवक अदिती डगळे हिने केले. पाहुण्यांचा सत्कार प्रा. पंकज दुर्वे, प्रा.अर्चना होळकर व प्रा.अरशद शेख यांनी केले. यावेळी सूत्रसंचालन रा. से. यो. स्वयंसेवक रितेश बनकर याने केले. तसेच उपस्थितांचे आभार प्रदर्शन शिपा तांबोळी हिने मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleकर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
Next articleमुक्रमाबाद येथे ७५व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री छत्रपती संभाजी विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here