Home उतर महाराष्ट्र पत्रकारांनी विवेक जागृत ठेवण्याचे काम करावे – आ. लहू कानडे

पत्रकारांनी विवेक जागृत ठेवण्याचे काम करावे – आ. लहू कानडे

53
0

आशाताई बच्छाव

IMG_20240120_181848.jpg

पत्रकारांनी विवेक जागृत ठेवण्याचे काम करावे – आ. लहू कानडे
अशोक गाडेकर यांना स्व. अशोक तुपे पत्रकारिता पुरस्कार प्रदान

श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी)- आज देशामध्ये समाजाचे विघटन करण्याचे काम जोमात सुरू आहे. यासाठी पत्रकारांनी जागृत राहून विवेक जागविण्याचे काम करणे आवश्यक आहे. लोकशाहीचा चौथा खांब समजली जाणारी पत्रकारिता आज आतून पोखरली गेली आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांना निशाणा बनविले जात आहे. एनडीटीव्ही, लोकशाही टीव्ही ही त्याची उदाहरणे आहेत.श्रीरामपूरच्या विकासात पत्रकारांचे योगदान मोलाचे असल्याचे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले.
आमदार कानडे यांच्या यशोधन कार्यालयामध्ये लोकहक्क फाउंडेशनतर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी लोकहक्क फाउंडेशनतर्फे दिला जाणारा स्व. अशोक तुपे पत्रकारिता पुरस्कार श्रीरामपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष व दै. सार्वमतचे वृत्तसंपादक ज्येष्ठ पत्रकार अशोक गाडेकर यांना देण्यात आला. पाच हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल, फेटा व पुस्तक अशा स्वरूपाचा हा पुरस्कार आमदार लहु कानडे, दिलीप तुपे, विलास तुपे, निखील तुपे, सचिन तुपे यांच्या हस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत गाडेकर यांना देण्यात आला. याप्रसंगी उपस्थित सर्व पत्रकारांचा फेटा, शाल व पुस्तक देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक, माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संजय छल्लारे, माजी नगरसेवक मुख्तार शाह, कलीम कुरेशी, रज्जाक पठाण, जेष्ठ पत्रकार रमेश कोठारी, सुनील कुलकर्णी, अतुल खरात आदी उपस्थित होते.
आमदार कानडे यांनी पत्रकारितेचा इतिहास सांगताना 1832 साली सुरू झालेले दर्पण हे वृत्तपत्र, त्याचबरोबर नगरमधून निघणारे 197 वर्षांपूर्वीचे ज्ञानोदय हे साप्ताहिक व नेवासा तालुक्यातून निघणारे दिनमित्र वृत्तपत्र हे पत्रकारिताचे खरे आरसे होते, असे सांगून 1982 साली मी सर्वप्रथम पुस्तक लिहिले. आमच्यातील साहित्यिक विद्रोही होते. आमची भाषा ही आमची बोलीभाषा होती. साहित्यातून विवेक जागृत ठेवण्याचे काम आमचे लोकांनी केले, हेच काम पुढे पत्रकारांनी सुरू ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. स्व. अशोक तुपे यांचा सर्व विषयांचा गाढा अभ्यास होता. विशेषत: शेती व पाट पाणी हा त्यांच्या आवडीचा विषय होता. चर्चेच्या ओघात तास न तास आम्ही बोलत होतो. मी काँग्रेस पक्षामध्ये जावे, असा सल्ला तुपे यांचा होता असे सांगून त्यांनी स्व. अशोक तुपे यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
लोकहक्क फाउंडेशनतर्फे जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी पुरस्कार देण्याचे आपण गेल्या वर्षीपासून सुरु केले. मागील वर्षी लोकसत्ताचे जेष्ठ पत्रकार मोहनीराज लहाडे, अहमदनगर यांना पुरस्कार दिला. यावर्षी सर्वानुमते अशोक गाडेकर यांची निवड करण्यात आली. पुढील काळामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील पत्रकारांना देखील गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी पत्रकारांची समिती स्थापन करणार आहोत. परंतु त्यासाठी सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन आपले प्रतिनिधी या समितीसाठी द्यावेत. पत्रकारांच्या अनेक संघटना झाल्या आहेत. याकडे त्यांनी लक्ष वेधले.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे, ज्ञानेश्वर मुरकुटे, संजय छल्लारे यांनी शुभेच्छा दिल्या. सत्कारास उत्तर देताना श्री. गाडेकर यांनी स्व. अशोक तुपे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली याचा उल्लेख करत त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले असे सांगून पत्रकार म्हणून काम करताना समाजाला दिशा देण्याचे काम आम्ही सातत्याने करीत असतो. अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकार करतात, असे सांगितले. प्रास्ताविक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक यांनी केले. सूत्रसंचालन संतोष मते यांनी केले.

चौकट .
पुरस्काराची रक्कम ज्येष्ठ नागरिक संघाला
पत्रकारिता पुरस्काराची मिळालेली 5 हजार रुपयांची रक्कम श्री. गाडेकर यांनी श्रीरामपूर तालुका पत्रकार संघाला सुपूर्द केली. पत्रकार संघातर्फे सामाजिक कार्यास हातभार लावला जाणार असून ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहाचे वायरिंग करून देण्याचे काम पत्रकार संघाने यापूर्वी मान्य केले आहे, पुरस्काराची रक्कम या कामासाठी पत्रकार संघाकडे देत असल्याचे सांगून खजिनदार अनिल पांडे यांच्याकडे सुपूर्द केली.
………….

Previous articleयुवकांनी कॉंग्रेस पक्षाचा विचार सामान्यांपर्यंत पोचवून भाजपाचा खरा चेहरा समोर आणावा- आ. कानडे
Next articleमुखेड तालुक्यातील अंबुलगा येथील मुलगी झाली क्लासवन अधिकारी     
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here