Home उतर महाराष्ट्र युवकांनी कॉंग्रेस पक्षाचा विचार सामान्यांपर्यंत पोचवून भाजपाचा खरा चेहरा समोर आणावा- आ....

युवकांनी कॉंग्रेस पक्षाचा विचार सामान्यांपर्यंत पोचवून भाजपाचा खरा चेहरा समोर आणावा- आ. कानडे

44
0

आशाताई बच्छाव

IMG_20240120_181439.jpg

युवकांनी कॉंग्रेस पक्षाचा विचार सामान्यांपर्यंत पोचवून भाजपाचा खरा चेहरा समोर आणावा- आ. कानडे
श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी)-विधानसभा मतदार संघातील बूथ प्रतिनिधी,कार्यकर्ते व पदाधिकारी मेळावा संपन्न
श्रीरामपूर – केंद्रातील भाजपा सरकारने मोठ्या उद्योगपतींना रेल्वे, विमानतळ यासह मोठ-मोठे उद्योग विकून पैसा मिळविला. हेच उद्योगपती देश चालवायला लागले आहेत. सोयाबीन, कांदा यासारख्या पिकांना भाव मिळू नये म्हणून निर्यातबंदी करून शेतकर्यांना आत्महत्या करण्यास भाग पडले, अशी टीका आमदार लहू कानडे यांनी केली. कॉंग्रेस पक्षाने लोकशाही पद्धतीने कारभार करून समतेचा विचार रुजविला. युवकांनी सोशल मिडीयाचा मोठ्या प्रमाणावर वापर करून कॉंग्रेस पक्षाचा विचार सामान्यांपर्यंत पोचवून भाजपा सरकारचा खरा चेहरा समोर आणावा, असे आवाहन आ. कानडे यांनी केले.
कॉंगेस पक्षाच्यावतीने येथील आ. कानडे यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात आयोजित श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील पक्षाचे बूथ प्रतिनिधी, कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या मेळाव्यात आ. कानडे बोलत होते.तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन गुजर,जिल्हा सरचीटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे,माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे, राज्य महिला कॉंग्रेसच्या महासचीव डॉ. वंदना मुरकुटे, विष्णूपंत खंडागळे, कार्लस साठे, अँड समीन बागवान यावेळी उपस्थीत होते.
आ. कानडे म्हणाले, कॉंग्रेसने सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन देशाचा विकास केला. सर्व क्षेत्रात प्रगती केली. भाजपा सरकारने सत्तेत आल्यापासून हे चक्र उलटे फिरण्यास सुरुवात केली.त्यासाठी संघटितपणे कट करून सतत खोटे सांगून दिशाभूल केली.वारंवार खोटी गोष्ट सांगत ती खरी असल्याचे भासविले. राम मंदिराच्या नावावर राजकारण सुरु केले. शेतकर्यांच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा होतील, उत्पन्न दुप्पट होईल, असे सांगितले, त्यांच्या अंध भक्तांनी त्याचा वारंवार खोटा प्रचार केला. परंतु तसे काही झाले नाही. इथेनॉल उद्योगात ७० हजार कोटीची गुंतवणूक असताना इथेनॉलवर बंदी घालून हा निर्णय पुन्हा बदलण्याची वेळ आली. जनतेकडून वस्तू सेवा कराच्या माध्यमातून पैसा गोळा केल्याचे ते म्हणाले.
२२ जानेवारीच्या अयोद्धेतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर आपणही कार्यकर्त्यांना घेऊन तेथे जाऊ, असे सांगून आ. कानडे म्हणाले, निवडणूक आयोगाने ८० वर्षापुढील व्यक्तीचे मतदान घरी जाऊन घेण्याचे सुचविले आहे.त्यामुळे मतदान प्रतीनिधीची जबाबदारी वाढली आहे. चुकीचे मतदान होऊ नये याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. कॉंग्रेस पक्षाने सोशल मिडीयावर अधिक भर दिला आहे. फेसबुक, इंस्ताग्राम, ट्वीटर या सारख्या साधनांचा वापर वाढवावा लागणार आहे. तरुणांनी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून कॉंग्रेस पक्षाचा विचार सर्व सामान्यांपर्यंत पोहाचवावेत, असे आवाहन आ. कानडे यांनी केले.
तालुका कायम आमच्या दावणीला बांधलेला पाहिजे, असे काही लोकांना वाटते. राजकारणात आपण काही तत्वे पाळली असल्याने आज उजळमाथ्याने फिरतो आहे. कॉंग्रेस पक्षाच्या विचारापासुन आपण दूर गेलेलो नाही. पक्षाच्या विचारांना छेद होऊ लागल्याने आपण बाजूला झालो. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने आपण आ. कानडे यांच्यासोबत आल्याचे सचीन गुजर यांनी स्पष्ट केले. , राज्य महिला कॉंग्रेसच्या महासचीव डॉ. वंदना मुरकुटे यांच्याकडे नांदेडचे निरीक्षक पद असल्याने श्रीमती सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली पिरामिड पद्धतीने महिलांचे संघटन केल्याचे सांगून या मतदार संघात त्याच पद्धतीने महिलांचे संघटन करावे, असे सुचविले. तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक यांनी बूथ कमिटी, शहर, तालुका कमिटी, बूथ प्रतिनिधी, ब्लॉक कमिटी याविषयीची माहिती दिली.
यावेळी जिल्हा सरचीटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, कार्लस साठे, बापू सदाफळ, अनिल ढोकाचौळे, भाऊसाहेब पारखे, आनंदा साळवे, रज्जाक पठाण, अँड. मधुकर भासले यांनी मनोगत व्यक्त केले. अँड समीन बागवान यांनी स्वागत केले. माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे यांनी आभार मानले.
………..

Previous articleसावित्रीबाई फुले व माता जिजाबाई यांचे विचार समाजात रुजवणे म्हणजे तीळ संक्रांत –शोभा बावनकर
Next articleपत्रकारांनी विवेक जागृत ठेवण्याचे काम करावे – आ. लहू कानडे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here