Home उतर महाराष्ट्र । विठ्ठल नामाची शाळा भरली।।

। विठ्ठल नामाची शाळा भरली।।

86
0

आशाताई बच्छाव

IMG-20230630-WA0053.jpg

कारभारी गव्हाणे प्रतिनिधि सोनई

_।। विठ्ठल नामाची शाळा भरली।।

काल गुरुवार (दि. 29जून 2023) साजरी होत असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी, भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. विठुराया अन् आषाढीचे महत्त्व शाळांमधील चिमुकल्यांनाही समजावे, या उद्देशाने आज गुरुवारी सुजाता इंटरनॅशनल स्कुल, सोनई मध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. वृक्षदिंडी, वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडी, रिंगण ,अभंग आणि भक्तीगीतांवर मुलांचे नृत्य व गायन तसेच विविध सांस्कृतिक देखावे असे अनेक उपक्रम यावेळी राबविण्यात आले. चिमुकल्यांनी विठुनामाचा जयघोष करीत त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शाळेच्या पटांगणात ज्ञानोबा-माऊलींच्या गजरात विलोभनीय दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक श्री किरण सोनवणे सर यांच्या हस्ते विठ्ठलाच्या महाआरतीने करण्यात आली व सर्व शाळेचा परिसर विठूनामाणे दुमदुमून गेला होता चारशेपेक्षा जास्तवेगवेगळ्या अभंगांवर शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनि ,शिक्षकवृंदाने आणि पालकांनी फेर धरून, फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. या सोहळ्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ‘रिंगण’ होते . दीडशे पेक्षा जास्त विद्यार्थी भगवा झेंडा हाती घेऊन यात सामील झाले होते, तर विद्यार्थिनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या होत्या. पावसाच्या रिमझिम सरींतला हा सोहळा पाण्यासाठी पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. या सोहळ्याची पसायदानाने सांगता करण्यात आली. तसेच शाळेचे संस्थापक श्री.किरण सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष दिंडी म्हणजे काय याचा विद्यार्थ्यांना अनुभव देण्यात आला तसेच दिंडीच्या वाटेतील असणारा दिवेघाट, चंद्रभागा नदी चे महत्व, व पंढरपूर मधील प्रत्यक्षात पांडुरंग मूर्ती दर्शन देखावे आदी उभारण्यात आले होते संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील शिक्षक सचिन चांडे सर, उर्मिला साळुंके मॅडम,वंदना बारहाते मॅडम, रोहित लहाड सर, स्वाती गडाख मॅडम, व इतर शिक्षकांनी यशस्वीरित्या पूर्ण केले .

 

Previous articleपत्रकारितेतील निर्भिड व्यक्तीमत्व शिवराज पाटील पवार
Next articleसमृद्धी महामार्गावर एका खाजगी बसला भीषण अपघात;
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here