Home नांदेड मुखेड तालुक्यातील अंबुलगा येथील मुलगी झाली क्लासवन अधिकारी     

मुखेड तालुक्यातील अंबुलगा येथील मुलगी झाली क्लासवन अधिकारी     

45
0

आशाताई बच्छाव

IMG_20240120_182439.jpg

मुखेड तालुक्यातील अंबुलगा येथील मुलगी झाली क्लासवन अधिकारी                                    देगलूर-(संजय कोंकेवार) माणसाच्या अंगी जिद्द जर असली तर स्वतःच्या सामर्थ्यावर व मेहनतीवर माणूस कोणत्याही पदापर्यंत पोहचवु शकतो. कु.मंजुश्री माधवराव कल्लेवाड हे दाखवून दिले आहे एका खेडेगावात जन्म घेऊन शहरी भागात जाऊन उच्च शिक्षण घेऊन रात्रीचा दिवस करून उराशी बाळगलेली स्वप्न प्रत्यक्षात साकार केली आहे.नुसतीच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्य प्रशासकीय सेवेतील उपजिल्हाधिकारी,तहसीलदार,गटविकास अधिकारी,आदिवासी प्रकल्प शिक्षणाधिकारी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी आधी वर्ग १ पदाच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला असून,अंतिम गुणवत्ता यादीत कु.मंजुश्री माधवराव कल्लेवाड हिची अनुसूचित जमाती (एस.टी) पर्वर्गातून मुलींमध्ये चौथ्या क्रमांकांनी वर्ग१च्या पदावर निवड झाली आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबगाव येथे कार्यरत असलेले लिपिक माधवराव कल्लेवाड यांची ही मुलगी आहे.बालपणापासूनच अभ्यासात हुशार असून ती लहानपणापासूनच सांगत होती की,मी अशी तशी अधिकारी होणार नाही.झाले तर क्लासवन अधिकारीच होऊन दाखवीन अशी सुरुवातीपासूनच सांगत होती.व तिचे स्वप्न व आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण झाल्याने त्यांचा आनंद आज गगनांशी मावेनासा झाला असुन या निवडीचे मंजुश्रीचे कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव व अभिनंदन केले जात आहे.

Previous articleपत्रकारांनी विवेक जागृत ठेवण्याचे काम करावे – आ. लहू कानडे
Next articleकानळद जि प शाळेच्या समीक्षा जाधव ची धावणे प्रकारात जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here