Home गडचिरोली इंदिरानगर क्रिकेट क्लब गडचिरोली यांच्या सौजन्याने भव्य रबरी बाल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन...

इंदिरानगर क्रिकेट क्लब गडचिरोली यांच्या सौजन्याने भव्य रबरी बाल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांचे हस्ते फीत कापून संपन्न..

17
0

आशाताई बच्छाव

IMG_20240120_080123.jpg

इंदिरानगर क्रिकेट क्लब गडचिरोली यांच्या सौजन्याने भव्य रबरी बाल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांचे हस्ते फीत कापून संपन्न..
—————————————-
खासदार अशोक नेते यांनी स्वतः खेळाडूंचे नमो चषक 2024 चे नोंदणी फार्म भरून घेतले
———————————-

गडचिरोली,,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)-:-आज दिनांक १९ जानेवारी २०२४ रोज शुक्रवार ला इंदिरानगर क्रिकेट क्लब गडचिरोली यांच्या सौजन्याने.. भव्य रबरी बाल क्रिकेट स्पर्धा गोटूल भूमी चांदाळा रोड,इंदिरानगर गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले.

या क्रिकेट स्पर्धेच्या सर्वप्रथम सुरूवातीला स्वच्छ मंदिर अभियान अंतर्गत खासदार अशोक नेते यांनी हाती झाडू घेऊन गोटूल भूमी या मंदिर गाभाऱ्यातील परिसरातील केरकचरा, साफसफाई करून स्वच्छ करण्यात आले.
या नंतर या भव्य रबरी बाल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांनी फित कापून केले.
यावेळी दोन्ही संघाचा टॉस झाल्यावर दोन्ही संघांना हस्तांदोलन करून शुभेच्छा देत खासदार अशोक नेते यांनी हातात बॅट घेऊन खेळण्याचा आनंद घेण्यासाठी उत्सुकतेने मैदानात उतरून खेळ खेळला.

याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी खेळाडूंविषयी आपल्या भावना व्यक्त करतांना या वर्षी अनेक युवक वर्ग उत्साहाने प्रोत्साहित होऊन नमो चषक -2024 टूर्नामेंट सहभागी होऊन खेळ खेळल्या जात आहे.याकरिता खासदार अशोक नेते यांनी स्वतः नमो चषक 2024 चे नोंदणी फार्म दोन्ही संघाच्या खेळाडूंचे नोंदणी फार्म केले.

भारतीय जनता पार्टी तर्फे नमो चषक 2024 चा नोंदणी फार्म सदस्यता अभियान सुरवात करण्यात आले असून युवा मोर्चा च्या प्रत्येक कार्याचे सक्तीने साथ देऊन सदैव युवा मोर्चा च्या पाठीशी आहे असे सांगून जास्तीत जास्त नमो चषक 2024 साठी सदस्यांनी नोंदणी करून यांच लाभ घ्यावे.
आपणही सर्व खेळाडूंनी नोंदणी फार्म भरून नमो चषक, नमो अॅप डाऊनलोड करून घ्यावा. अशा सूचना यावेळी खेळाडूंना दिल्या.

यावेळी प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, भाजपा जिल्हा सचिव अनिल कुनघाडकर,युवा मोर्चाचे सचिव हर्षल गेडाम,युवा मोर्चाचे महामंत्री मंगेश रणदिवे,गणवीर साहेब, सुजित मेश्राम, संदिप वासेकर, जगदिश गडपायले,राहुल चूनचूनवार,शाहरुख पठाण,छोटु पठाण,आनिल नैताम तसेच मोठ्या संख्येने युवा खेळाडू उपस्थित होते.

Previous articleसीमा नदीवरील पुलाचे भूमिपूजन, पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते उद्घाटन
Next articleता.मुदखेड रोहिपिंपळगाव मध्ये झालेल्या घटनेबद्दल भोकर बंद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here