• Home
  • 🛑 *बोंड्ये – नारशिंगे येथे नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद* 🛑

🛑 *बोंड्ये – नारशिंगे येथे नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद* 🛑

🛑 *बोंड्ये – नारशिंगे येथे नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद* 🛑
✍️रत्नागिरी:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी:⭕ *छावा प्रतिष्ठान रत्नागिरी आणि इन्फिगो आय केयर हॉस्पिटल रत्नागिरीतर्फे ग्रुप ग्रामपंचायत बोंड्ये – नारशिंगे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला. येथील ग्रुप ग्रामपंचायत बोंड्ये – नारशिंगे ग्रामपंचायत सभागृहात शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी शिबिर संपन्न झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून शिबिर झाले. यावेळी छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे संस्थापक/अध्यक्ष श्री.सुनिल धावडे सचिव श्री.समीर गोताड,खजिनदार श्री.गणेश कांबळे, कार्याध्यक्ष श्री.संतोष आग्रे,संघटक श्री.समीर धावडे,मीडिया प्रमुख श्री.नितीन रोडे,प्रवक्ता श्री.संगम धावडे,सल्लागार श्री.मोहन पवार यांनी इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या हर्षदा राजापकर, संकेत शिंदे,अनिल यादव आणि आदिती आग्रे या कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर तपासणी शिबिराला सुरुवात झाली. या शिबिराचा परिसरातील ११५ नागरिकांनी लाभ घेतला.या शिबिराला सरपंच सौ.सुहानी कुल्ये,उपसरपंच श्री.महेशजी देसाई,माजी सरपंच श्री.विश्राम पानगले,पोलीस पाटील श्री.प्रविणजी कांबळे, माजी पोलीस पाटील श्री.चिमाकांतजी कुल्ये,ग्रामसेवक श्री.सोनकांबळे साहेब,प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सौ.रावणंग मॅडम इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.शिबिर यशस्वी करण्यासाठी छावा प्रतिष्ठान चे सदस्य श्री.संदेश धावडे,प्रशांत कांबळे, सुदीप पवार,निलेश कळंबटे,विजय धावडे,राहुल धावडे,तन्वी देसाई यांनी विशेष मेहनत घेतली.*

*छावा प्रतिष्ठान रत्नागिरी*
*रजि.नं. रत्नागिरी/०००००६२/२०२०*…⭕

anews Banner

Leave A Comment