• Home
  • 🛑 पर्यटकांसाठी राज्य सरकारकडून खुशखबर…! राज्यातील पर्यटनस्थळे सुरु होणार 🛑

🛑 पर्यटकांसाठी राज्य सरकारकडून खुशखबर…! राज्यातील पर्यटनस्थळे सुरु होणार 🛑

🛑 पर्यटकांसाठी राज्य सरकारकडून खुशखबर…! राज्यातील पर्यटनस्थळे सुरु होणार 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्यूरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕राज्यात कोरोनामुळे सर्वकाही ठप्प झाले आहे. सर्वच क्षेत्रावर याचा परिणाम होत आहे. यामध्ये राज्यातील पर्यटनावर देखील सावट आले आहे.

सध्या सहा महिन्यानंतर देश पुर्ववत सुरू झाला आहे. कोरोनाची भिती मात्र अद्यापही कायमच आहे. असे असले तरी पर्यटकांसाठी आता आनंदाची बातमी आहे.

महत्त्वाच्या पर्यटनस्थळी गेल्यानंतर निवासासाठी असलेले शासकीय रिसॉर्ट आता कोरोनाची नियमावली पाळून ३३ टक्के कक्ष खुले करण्यात आलेले आहे. घरात बसून कंटाळलेल्या लोकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

यामध्ये पर्यटकांना ऑनलाईन बुकींग करता येणार आहेत. पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटक निवास नागपूर, माथेरान, ताडोबा, शिर्डी पिलग्रीम्स इन, अजिंठा फरदापूर ,अजिंठा टी जंक्शन, औरंगाबाद येथील ३३% कक्षांचे ऑनलाईन आरक्षण सुरू झाले आहे.

कोरोनापासून खबरदारीच्या सर्व उपायांसह पर्यटकांचे स्वागत करण्यास येथील व्यवस्था सज्ज झाली आहे. राज्यभरात कोरोनाच्या संकटाने पर्यटनासह सर्वच क्षेत्रावर मंदीचे सावट आले आहे.

आता काही प्रमाणात लोक बाहेर पडू लागले आहे. राज्यसरकारच्या वतीने पर्यटन स्थळे खुली करावी अशी मागणी आहे. अर्थात ती लवकरच सुरु होतील अशी चिन्हे आहेत.

पर्यटकांची सुरक्षितता ठेवत पर्यटनाचा आनंद देण्याचे मोठे आवाहन देखील राहणार आहे. औरंगाबाद जिल्हयातील शासकीय तसेच खासगी रिर्सार्ट पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत.

येणाऱ्या काळात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली तर लवकरच मोठ्या प्रमाणावर पर्यटन स्थळे सुरू होतील…⭕

anews Banner

Leave A Comment