• Home
  • 🛑 “गुगल प्ले ” स्टोरनं स्कॅनर-२ सह हटवली ६ अ‍ॅप्स….! तुमच्या स्मार्टफोनमध्ये असतील तर ताबडतोब करा ‘ डिलिट 🛑

🛑 “गुगल प्ले ” स्टोरनं स्कॅनर-२ सह हटवली ६ अ‍ॅप्स….! तुमच्या स्मार्टफोनमध्ये असतील तर ताबडतोब करा ‘ डिलिट 🛑

🛑 “गुगल प्ले ” स्टोरनं स्कॅनर-२ सह हटवली ६ अ‍ॅप्स….! तुमच्या स्मार्टफोनमध्ये असतील तर ताबडतोब करा ‘ डिलिट 🛑
✍️ नवी दिल्ली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नवी दिल्ली :⭕ गुगलने प्ले स्टोरवरून कन्व्हेनियंट स्कॅनर-2 आणि सेफ्टी अ‍ॅपलॉकसह सहा अशी मोबाईल अ‍ॅप्लीकेशन्स हटवली आहेत, ज्यामध्ये मालवेयर दडलेला होता. हटवण्यात आलेल्या अ‍ॅप्सध्ये पुश मेसेज-टेक्सटींग अँड एसएमएस, इमोजी वॉलपेपर, सेपरेट डॉक स्कॅनर आणि फिंगरटिप गेमबॉक्सचा सुद्धा समावेश आहे. ही धोकादायक अ‍ॅप्स सायबर सिक्युरिटी रिसर्चने शोधून काढली आहेत. या अ‍ॅप्समध्ये जोकर मालवेयर होता. यूजर्सना हे सर्व अ‍ॅप्स तात्काळ डिलिट करण्यास सांगण्यात आले आहे.

तीन वर्षात हटवली 1,700 पेक्षा जास्त अ‍ॅप्स
सायबर सिक्युरिटी फर्म प्रेडियोनुसार, ज्या स्मार्टफोनमध्ये जोकर मालवेयर येतो, त्यामध्ये यूजर्सच्या महितीशिवाय प्रीमियम सर्व्हिस सबस्क्राइब होतात.

मागील तीन वर्षात गुगलने प्ले स्टोरवरून जोकर मालवेयरची 1,700 अ‍ॅप्स हटवली आहेत. ही 6 धोकादायक अ‍ॅप्स आपर्यंत 2 लाखपेक्षा जास्तवेळा डाऊनलोड केली गेली आहेत. यूजर्स डाटा सिक्युरिटीच्या दृष्टीने या अ‍ॅप्सना धोकादायक कॅटगरीत ठेवण्यात आले आहे. यूजर्सना ही अ‍ॅप्स न वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या अ‍ॅप्सवर मलीशश कंटेन्ट आढळला आहे.

यूजरच्या परवानगीशिवाय प्रीमियम सर्व्हिस
गुगलने ही सर्व अ‍ॅप्स प्ले स्टोरवरून हटवली आहेत, परंतु जर ही तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर धोकादायक ठरू शकतात. मागच्या वर्षीसुद्धा 100 पेक्षा जास्त अ‍ॅपमध्ये मलावेयर आढळला होता. मालवेयर वाले अ‍ॅप्स ओळखणे सोपे नसते. सायबर सिक्युरिटी फर्मच्या रिसर्चरने गुगल प्ले स्टोरवर जोकर ड्रॉपर आणि प्रीमियम डायलर स्पायवेयरचे नवे सॉफ्टवेयर पकडले होते, जे तुमच्या स्मार्टफोनमध्ये अनेक प्रकारची गडबड करते.

हे यूजर्सच्या मंजूरीशिवाय अनेक प्रीमियम सर्व्हिस सुरू करतात…⭕

anews Banner

Leave A Comment