• Home
  • *कांदा प्रश्नी सक्षम लिखाण केल्याबद्दल युवा मराठा न्युजचे कौतुक*

*कांदा प्रश्नी सक्षम लिखाण केल्याबद्दल युवा मराठा न्युजचे कौतुक*

*कांदा प्रश्नी सक्षम लिखाण केल्याबद्दल युवा मराठा न्युजचे कौतुक* दहिवड (युवराज देवरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क )-
कांद्याचे भाव वाढले की वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनल महागाई वाढल्याच्या बातम्या लावुन बाजारभाव कमी करण्यासाठी प्रयत्न करतात. असा नेहमीचा अनुभव आहे. व सध्यस्थितीतही पत्रकारिता ही उत्पादक शेतक-यांपेक्षा खरेदीदार व्यापारी व जनतेची बाजू घेतांना दिसते. यामुळे कधीकधी पत्रकार आणि बातम्यांचा राग येतो. मात्र आज युवा मराठा न्यूज माध्यमातून पत्रकार युवराज देवरे यांनी” ” *कांद्याचे बाजारभाव वाढुनही शेतकरयांच्या डोळ्यात पाणी* ” हे सत्य पटवून देणारी खरी बातमी लिहली आणि कांद्याचे सविस्तर व अभ्यासपूर्ण गणित मांडून जगासमोर शेतकऱ्यांची व्यथा मांडली. यामुळे युवराज देवरे यांचा अभ्यास व अभ्यासपूर्ण पत्रकारितेने शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर केला आहे एवढं नक्की.!
युवा मराठाचे शेतकरी परिवाराकडून आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून जाहीर आभार.

anews Banner

Leave A Comment