Home भंडारा पवनी येथील संघर्ष समितीच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

पवनी येथील संघर्ष समितीच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

21
0

आशाताई बच्छाव

IMG_20240120_074634.jpg

पवनी येथील संघर्ष समितीच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

पवनी येथे 16 जानेवारीपासून साखळी उपोषणाला सुरुवात

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) पवनी येथे दिनांक 16 जानेवारीपासून पवनी येथे उपजिल्हा रुग्णालयाचे काम सुरू करा या मागणीला धरून पवनी नागरिक संघर्ष समिती समिती तर्फे साखळी उपोषण सुरू आहे .या उपोषणाला पाठिंबा वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्हा च्या वतीने प्रत्यक्षपणे पवनी येथे जाऊन त्यांनी पाठिंबाचे पत्र देऊन पाठिंबा जाहीर केलेला आहे .
याप्रसंगी काम सुरू न झाल्यास 26 जानेवारीला आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यामुळे 26 जानेवारी च्या अगोदर उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम सुरू त्वरित सुरू करावे नाहीतर वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्ह्यामध्ये आंदोलन उभा करेल असा इशारा भंडारा जिल्ह्याचे जिल्हाअध्यक्ष धनपाल गडपायले ,जिल्हा संघटक डी जी रंगारी, जिल्हा महासचिव दिलीप वानखेडे, जिल्हा सल्लागार. चरणदास मेश्राम ,सदानंद रंगारी यांनी दिलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here