Home भंडारा स्व.निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुपकर येथे महात्मा गांधी व...

स्व.निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुपकर येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी –

27
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231005-072735_WhatsApp.jpg

स्व.निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुपकर येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी –

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) लक्ष्मी शिक्षण संस्था व क्रीडा मंडळ केसलवाडा/वाघ द्वारा संचालित स्व.निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी तुपकर येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ. विश्वास खोब्रागडे यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा.डाॅ. विश्वास खोब्रागडे यांनी ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचे महत्वाचे योगदान असल्याचे सांगितले. ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनीचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने कृष्णमुरारी कटकवार महाविद्यालय साकोली यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचे विचार व त्यांच्या कार्यावर विविध ऐतिहासिक घटनाक्रमावरील सोदाहरणे देत आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डाॅ. अर्चना निखाडे यांनी म्हात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर विस्तृतपणे प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. भेदराज ढवळे,लिपीक खेमराज वाघाये,श्रीकांत धुर्वे,अजय मेश्राम,ग्रंथालय परिचर गितेश्वरी तरोणे, शिपाई किशोरी ननोरे,अमर जांभुळकर,तेजेंद्र सदावर्ती,शोएब शेख तसेच विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. विशाल गजभिये यांनी केले व आभार ग्रंथालय परिचर गितेश्वरी तरोणे यांनी व्यक्त केले.

Previous articleतिलक वैद्य यांची सचिव पदी निवड
Next articleएकोडी (रामटोली) येथील प्रलंबित वनहक्क दावे मंजूर करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here