Home सोलापूर जानेवारीत रेल्वे मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरु करण्याचा प्रयत्न..

जानेवारीत रेल्वे मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरु करण्याचा प्रयत्न..

84
0

आशाताई बच्छाव

IMG_20231210_184650.jpg

जानेवारीत रेल्वे मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरु करण्याचा प्रयत्न..

 ऑनलाईन वेब पोर्टल युवा मराठा न्युज पेपर महादेव घोलप.

सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्यातील धाराशिव-तुळजापूर या ३० किलोमीटर लांबीच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी ५४४ कोटी रूपयांच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरु असून लवकरात लवकर निविदा अंतिम करण्याच्या सूचना रेल्वेचे मुख्य अभियंता श्री.दिनेश कटारिया यांना दिल्या आहेत. जानेवारीत रेल्वे मार्गाचे काम प्रत्यक्ष सुरु करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यातील या कामासाठी १० ऑगस्ट रोजी सोलापूर विभागाअंतर्गत नवीन ब्रॉडगेज लाईन अंथरण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. ३० किलोमीटरच्या या कामासाठी ५४४ कोटी रूपयांची निविदा प्रकाशित करण्यात आली आहे. १० ऑक्टोबर पर्यंत निविदा स्वीकारण्याची तारीख होती.
यामध्ये १६ कंत्राटदारांनी सहभाग नोंदविला असून या निविदांची छाननी करण्यासाठी आरआयटीएस या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. भरलेल्या निविदांच्या छाननीचे काम सुरु असून याला गती देत निविदा अंतिम करून प्रत्यक्षात जानेवारी महिन्यात काम सुरु करण्यासाठी आपण आग्रही आहोत.
३० महिन्यांच्या आत हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. या मार्गावर सांजा, वडगाव आणि तुळजापूर, असे ३ नवीन रेल्वे स्थानक उभारले जाणार आहेत. ठाकरे सरकारच्या अनास्थेमुळे रखडलेल्या या रेल्वे मार्गाचे काम लवकर पुर्ण करण्यासाठी कामाचे ३ टप्पे करण्यात आले असून धाराशिव जिल्ह्यातील कामाचे २ स्वतंत्र टप्पे करण्यात आले आहेत. एकूण ८४ किमी लांबीच्या या रेल्वेमार्गावर ११० पूल आणि ३ मोठे उड्डाणपूल असणार आहेत.
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर या रेल्वेमार्गासाठी ४५२.४६ कोटी रूपयांच्या निधीला तात्काळ मंजुरी देण्यात आली होती व नंतरच या कामाला वेग आला आहे. अडीच वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार आहे.

Previous articleराष्ट्रीय ओपन कराटे स्पर्धेत कु, अनुश्री राजपूत हिने पटकाविले दोन गोल्ड मेडल
Next articleअमरावती सूतगिरणी परिसरातील एका तरुणांकडून देशी कट्टा जप्त.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here