Home अमरावती अमरावती सूतगिरणी परिसरातील एका तरुणांकडून देशी कट्टा जप्त.

अमरावती सूतगिरणी परिसरातील एका तरुणांकडून देशी कट्टा जप्त.

37
0

आशाताई बच्छाव

IMG_20231210_185037.jpg

अमरावती सूतगिरणी परिसरातील एका तरुणांकडून देशी कट्टा जप्त.
————-
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती
स्थानिक सूतगिरणी परिसरातील शिवाजीनगर जवळ खुल्या मैदानातून देशी कट्टा बाळगणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास राजापेठ पोलिसांनी ही कारवाई केली. देशी कट्टा वापरणारा तरुण अक्षय संजय चव्हाण वय १९ चौरे नगर अमरावती असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो कट्टा आपण परिचयातील अजय गणेश वानखडे वय २२रा. शिवाजीनगर अमरावती यांच्याकडून घेतल्याची कबुली दिली. शिवाजीनगर सूतगिरणी परिसरातील खुल्या मैदानात एक युवक हा देशिक बनावटीचा कट्टा बाळगून उभा आहे अशी माहिती राजापेठ पोलिसांना मिळाले कारवाईदरम्यान त्याची अंगठी घेतली असता त्याच्याकडे २० हजार रुपये किमतीचा देशी कट्टा आढळून आला. आरोपीने स्वतःची ओळख अक्षय संजय चव्हाण अशी दिली. त्याच्याविरुद्ध राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचारे, उपनिरीक्षक गजानन काठोळे पोलीस निरीक्षक पुनीत कुलट सह पंकज खटे गणराज राऊत संजय वानखडे मनीष करके रवी लिखितकर यांनी ही कारवाई केली.

Previous articleजानेवारीत रेल्वे मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरु करण्याचा प्रयत्न..
Next articleअमरावतीत ११ महिन्यात आढळले डेंगू चे ५४४ रुग्ण, त्यापैकी एकाचा मृत्यू; गतवर्षीच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत तीन पट वाढ.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here