Home अमरावती अमरावतीत ११ महिन्यात आढळले डेंगू चे ५४४ रुग्ण, त्यापैकी एकाचा मृत्यू; गतवर्षीच्या...

अमरावतीत ११ महिन्यात आढळले डेंगू चे ५४४ रुग्ण, त्यापैकी एकाचा मृत्यू; गतवर्षीच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत तीन पट वाढ.

34
0

आशाताई बच्छाव

IMG_20231210_185355.jpg

अमरावतीत ११ महिन्यात आढळले डेंगू चे ५४४ रुग्ण, त्यापैकी एकाचा मृत्यू; गतवर्षीच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत तीन पट वाढ.
———–
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती
जिल्ह्यात कीटकजन्य आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वातावरणातील थंडावा हा कीटकजन्य आजार वाढीस कारणीभूत ठरला असून, जिल्ह्यात अकरा महिन्यात ५४४ डेंगू रुग्ण आढळले आहेत. तर २१ ऑक्टोंबर ला एका डेंगू पॉझिटिव्ह रुग्णता मृत्यू देखील झाला आहे.२०२२मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत १८५ डेंगू रुग्ण होते. त्यामुळे यंदाही आकडेवारी तीन पटणे वाढली असून आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. कीटक ज्यांना आजाराचे प्रमाण हे पावसाळ्यात वाढायला सुरुवात होतो. ज्यामध्ये डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया हे आजार डोके वर काढतात. जागोजागी सातणाऱ्या पाण्यामध्ये डेंगू आजार पसरविणारे डास वाढतात. सध्या वातावरण बदलल्यामुळे निर्माण झालेल्या थंडावा हे कीटक ज्यांना आजार वाढीसाठी कारणीभूत ठरत असल्याचे आरोग्य प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांनी ताप, डोकेदुखी, सांधे दुखणे, अंगावर पुरळ येणे यासारखे लक्षणाकडे दुर्लक्ष न करता तातडीने रुग्णाला जाऊन रक्ताची तपासणी करण्याची गरज आहे. जिल्ह्यात जून २०२३ पासून डेंगू रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली असून सप्टेंबर, ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यांमध्ये सर्वाधिक डेंगू रुग्ण आढळले आहेत. तर ऑक्टोंबर महिन्यात एक पॉझिटिव रुग्णाच्या मृत्याची नोंद आरोग्य प्रशासनाने केली आहे. महापालिका क्षेत्रात सर्वाधिक रुग्ण महापालिका क्षेत्रात सर्वाधिक डेंगू रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात १०२७ डेंगू संचयित रुग्णांचे रक्तजल नमुने आरोग्य विभागाने तपासले असता यामध्ये३३३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये एकाचा मृत्यू देखील डेंगू मुळे झाल्याची नोंद आरोग्य प्रशासनाला केली आहे ग्रामीण भागातील १२८८ संशयित रुग्णांमध्ये २११ रुग्णांची अहवाल डेंगू पॉझिटिव आलाआहे तर ३३ मलेरिया रुग्णांची नोंद आहे. जिल्हा डेंगू बरोबर 11 महिन्यात ११६ चिकनगुनिया रुग्ण यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागात ७९ तर मनपा क्षेत्रात ३७ रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर ३३ मलेरियाचे रुग्ण असून ग्रामीण क्षेत्रात २८ तर मनापासून ५ एकूण रुग्ण आढळले आहेत.

Previous articleअमरावती सूतगिरणी परिसरातील एका तरुणांकडून देशी कट्टा जप्त.
Next articleदोन दिवसीय तुमसर तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत १४१ प्रतिकृती ( उदघाटन,समारोप,बक्षिस वितरण समारोह संपन्न )
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here