Home भंडारा विदर्भवादी शेतकरी संघर्ष संघटनेच्या वतीने नागपूर येथील हिवाळी अधिवेशन येथे 8 डिसेंबर...

विदर्भवादी शेतकरी संघर्ष संघटनेच्या वतीने नागपूर येथील हिवाळी अधिवेशन येथे 8 डिसेंबर पासून धरणे आंदोलन

12
0

आशाताई बच्छाव

IMG_20231207_080039.jpg

विदर्भवादी शेतकरी संघर्ष संघटनेच्या वतीने नागपूर येथील हिवाळी अधिवेशन येथे 8 डिसेंबर पासून धरणे आंदोलन

संजीव भांबोरे

भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )विदर्भवादी शेतकरी संघटनेच्या वतीने 8 डिसेंबर 2023 पासून हिवाळी अधिवेशन नागपूर येथे धरणे आंदोलनाचे आयोजन आरबीआय चौक नागपूर येथे विदर्भवादी शेतकरी संघर्ष संघटनेचे नेते सदानंद धारगावे व उपाध्यक्ष नम्रताताई बागडे यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांच्या संदर्भात आयोजित करण्यात आलेले आहे .यात प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी देण्यात यावी ,धानाला 1000 रुपये बोनस देण्यात यावा ,सन 2006 ला पारित झालेला स्वामीनाथन आयोग तात्काळ लागू करावा ,धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावे ,शेतकरी ,शेतमजूर ,श्रावण बाळ वृद्ध विधवा महिला, दिव्यांग व निराधार यांना सन 1994 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार किमान सन्मान पेन्शन योजनेअंतर्गत ६ हजार रुपये महिना देण्यात यावा ,शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण करता 25% आरक्षण देण्यात यावे ,शेतकऱ्यांचे विज बिल माफ करण्यात यावी,भूमीहीन
लोकांना घरांचे पट्टे देण्यात यावे व त्यांना जागा उपलब्ध करून घरकुल देण्यात यावा ,शेतकरी ,शेतमजूर, श्रावण बाळ व वृद्ध यांच्या वयाची अट ६५ ऐवजी 60 करण्यात यावी ,विधवा महिलांची चालु पेन्शन बंद करू नये ,गॅस सिलेंडर 300 रुपयांनी देण्यात यावे, पेट्रोल ,डिझेलचे भाव कमी करण्यात यावे ,शेतकऱ्यांना बी ,बियाणे औषधी 50 टक्के सबसिडी देण्यात यावी ,वरील मागण्यांकरिता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे .या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सीमा सरनागत ,पौर्णिमा खांडेकर ,स्वाती वासनिक ,विजया बागडे, सुनिता राऊत ,सुमित्रा देव्हारे ,चरणदास बर्वेकर, गुलाब रंधवे ,सुनील गजभिये, बाबूलाल मोहारे ,टीकाराम रहाटे, निलेश बारस्कर ,सत्यप्रकाश हटवार, टीकाराम कावळे ,रामभाऊ फुंडे ,ज्ञानेश्वर कावळे ,चंद्राहास येटरे विलास पांचलवार ,बालकदास मेश्राम ,मच्छिंद्र काटेखाये, रमेश रंगारी ,विनोद पारधी ,राजेश थेरे ,नरेंद्र गजभिये तु,ळशीराम बिलावणे ,पंढरी बडवे शालिक मेश्राम हिरादार घाटोळे ,मनोहर ढोमणे ,गोपाल घाटोळे नीलिमा घरजाडे ,राधिका चौधरी ,राजू कडबे ,उमासंकर यादव, नीताराम देवगडे ,विठ्ठल राऊत, यांनी केलेले आहे.

Previous articleविदर्भवादी शेतकरी संघर्ष संघटनेच्या वतीने नागपूर येथील हिवाळी अधिवेशन येथे 8 डिसेंबर पासून धरणे आंदोलन
Next articleतुमसर तालुका न्यायालयात महापरिनिर्वाण दिन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here