Home भंडारा तुमसर तालुका न्यायालयात महापरिनिर्वाण दिन

तुमसर तालुका न्यायालयात महापरिनिर्वाण दिन

94

आशाताई बच्छाव

IMG_20231207_081344.jpg

तुमसर तालुका न्यायालयात महापरिनिर्वाण दिन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)तुमसर येथील तालुका न्यायालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तालुका वकील संघाने हा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी मान्यवरांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी तालुका न्यायालयाचे न्यायाधीश के.पी.दवणे,न्यायालयीन कर्मचारी, वकील उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांनी अत्यंत मोलाचे योगदान देशाला दिले आहे. आज देश त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालविणे हेच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली राहील, असे तालुका वकील संघांचे अध्यक्ष ऍड. विलासकुमार माटे यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तालुका वकील संघांचे पदाधिकारी वकील न्यायालयीन कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.