Home जालना राहत सोशल ग्रुप जालनातर्फे आयोजित मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्यात 19 जोडपे विवाह...

राहत सोशल ग्रुप जालनातर्फे आयोजित मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्यात 19 जोडपे विवाह बद्ध

43
0

आशाताई बच्छाव

IMG_20231205_182740.jpg

राहत सोशल ग्रुप जालनातर्फे आयोजित मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्यात 19 जोडपे विवाह बद्ध
जालना (दिलीप बोंडे) ः   दिनांक तीन डिसेंबर 2023 रोजी रविवार राहत सोशल ग्रुप जालना तर्फे सकाळी दहा वाजता आयेशा लॉन्स कदिम जालना येथे मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्यात 19 जोडपे विवाहबद्ध झाले. यावेळी प्रामुख्याने शब्बीर अहेमद अन्सारी अध्यक्ष ओबीसी ऑर्गनायझेशन, मुफ्ती मौलाना मोहम्मद अनिस, इकबाल पाशा, बदर चाऊस, विनय मेंढे, सहाय्यक धर्मदाय आयुक्त जालना अजित सिंग पाटील अधीक्षक धर्मदाय आयुक्त कार्यालय जालना मनोज वानखेडे लघुलेखक धर्मदाय आयुक्त कार्यालय डॉक्टर पालवे महिला व बालकल्याण रुग्णालय जालना, आयुब खान, राजेश राऊत, विनायक महाराज फुलंब्रीकर, मोहम्मद साहेब कॉन्ट्रॅक्टर, मोहम्मद मुफस्सीर कुरेशी, गणेश सुपारकर, राम सतकर, परमेश्वर गरबडे रियाज भाई, मोहन इंगळे, फिरोज बागवान, इब्राहिम पठाण, डॉक्टर मुशीर इनामदार, अब्दुल हफीज पत्रकार, बशारत अली खान अख्तर, काझी अब्दुल वहीद, फिरोज बागवान, दैनिक बदलता महाराष्ट्राचे संपादक मनोज कोलते पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात हाफिज सय्यद असरार यांनी कुराण पठण केले आणि वशारत अली खान अख्तर यांनी नाते रसूल सादर केली. यावेळी मुफ्ती मौलाना अनिस यांनी निकाहाच्या खुतबा आणि दुवा करून संबोधित करताना सांगितले की राहत सोशल ग्रुप जालना तर्फे मागील 22 वर्षापासून मुस्लिम सामूहिक विवाह आयोजित करण्यात येत आहे आणि आज राहत सोशल ग्रुप जालना तर्फे आज 19 जोडपे विवाहबद्ध झाले आहे. राहत सोशल ग्रुप जालना यांनी मागील 22 वर्षापासून आजपर्यंत 550 पेक्षा जास्त जोडपे विवाहबद्ध केले आहे. राहत सोशल ग्रुप जालना मुस्लिम सामूहिक विवाह मार्फत गोरगरिबांच्या मुला मुलींची लग्न स्वखर्चाच्या माध्यमातून केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here