Home जालना सर्पमित्र व वन्यजिव रक्षक शासकीय ओळखत्र आणि विमा सुरक्षा द्या; निसर्गरक्षक प्राणीमित्र...

सर्पमित्र व वन्यजिव रक्षक शासकीय ओळखत्र आणि विमा सुरक्षा द्या; निसर्गरक्षक प्राणीमित्र संघटनेची आमदार कैलास गोरंट्याल यांच्याकडे मागणी

28
0

आशाताई बच्छाव

IMG_20231205_183216.jpg

सर्पमित्र व वन्यजिव रक्षक शासकीय ओळखत्र आणि विमा सुरक्षा द्या; निसर्गरक्षक प्राणीमित्र संघटनेची आमदार कैलास गोरंट्याल यांच्याकडे मागणी

सर्पमित्रांच्या मागण्यासाठी अधिवेशनात आवाज उठविणार – आमदार कैलास गोरंट्याल यांचे आश्वासन.                                                       जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)-

महाराष्ट्र राज्यात सर्पमित्र आणि वन्यजिव रक्षकांना शासनामार्फत अधिकृत ओळखपत्र देण्यात यावे व त्यांचा किमान 50 लाख रुपयाचा विमा शासनाने काढावा या व इतर मागण्या जालना येथील निसर्गरक्षक प्राणीमित्र संघटनेच्या वतीने आमदार कैलास गोरंट्याल यांच्याकडे करण्यात आल्यात.
महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात कुठेही साप निघाल्यास सर्पमित्रांना बोलविले जाते. मनुष्यबळाच्या अभावी वन विभागाचे अधिकारी सापाचे रेस्क्यु करीत नाहीत. त्यामुळे सर्पमित्र धावून जातो. स्वतःचा जिव धोक्यात घालून सर्पमित्र सापाचे रेस्क्यु करीत असतो. परंतु, अचानक अनावधानाने एखादा दंश झाला तर सर्पमित्राचा अकाली मृत्यु होतो. त्यामुळे सर्पमित्राचा परिवार उघड्यावर येतो. अशा परिस्थीतीत सर्पमित्रांच्या परिवारापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे शासनाने सर्पमित्रांचा विमा उतरविणे आवश्यक आहे. तसचे रात्री-अपरात्री साप निघाल्यास सर्पमित्रांना घराबाहेर जावे लागते. अशा वेळी पोलीसांकडून त्यांच्यावर कारवाई केली जाते. सिग्नल अथवा ट्रॅफीक मधून सर्पमित्रांना तातडीने सापाचे रेस्क्यु करण्यासाठी जावे लागते. अशा वेळी पोलीस कारवाई होते. त्यामुळे सर्पमित्रांना शासकीय ओळखपत्र देऊन त्यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात यावा व रुग्णवाहीकेसारखी त्यांना सुट देण्यात यावी. तसेच त्यांचा आपत्कालीन सेवेत समावेश करण्यात यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलीय.

Previous articleराहत सोशल ग्रुप जालनातर्फे आयोजित मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्यात 19 जोडपे विवाह बद्ध
Next articleनांदगाव शहरात भाजपा ची विजय मिरवणूक संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here