Home अमरावती रेल्वे सुरक्षा बलाच्या’मिशन जीवन रक्षक’ने वाचविले ६६लोकांचे प्राण.

रेल्वे सुरक्षा बलाच्या’मिशन जीवन रक्षक’ने वाचविले ६६लोकांचे प्राण.

40
0

आशाताई बच्छाव

IMG_20231129_055239.jpg

रेल्वे सुरक्षा बलाच्या’मिशन जीवन रक्षक’ने वाचविले ६६लोकांचे प्राण.
————-
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती विभागीय संपादक.
अमरावती:-
मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आर पी एफ) ही रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्यास प्रवाशांच्या प्राणाचे रक्षण, पळून गेलेल्या मुलांचे रेस्क्यू अर्थ आणि लगेच रिट्रीवर अशा अनेक भूमिका बजावतात. त्यानुसार एप्रिल- ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत आरपीएफ जवानांनी’मिशन जीवन रक्षक’अंतर्गत स्वतःच्या जीव धोक्यात घालून ६६ जनांनचे प्राण वाचविले आहेत. यामध्ये मुंबई विभागात १९, भुसावळ विभागात १३, नागपूर विभागात १४, आणि सोलापूर ५, पुणे विभागात १५ जणांचा समावेश आहे. आरपीएफ च्या सतर्कतेमुळे बहुतेक प्रकरणांमध्ये अशा प्रवाशांचे प्राण वाचविले आहेत. प्रवासी निष्काळजीपणा करतात आणि धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना धोक्याचा सामाना करतात. काही वेळा विविध वैद्यकीय कारणामुळे आत्महत्येचा आहे प्रयत्न करतांना जीव वाचविला आहे. रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याच्या मुख्य कर्तव्या व्यतिरिक्त’अमानत’या ऑपरेशन अंतर्गत आर पी एफ ने त्यांच्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन गरजू प्रवाशांना मदत केली आहे आणि त्यांचे हरवलेले किंवा मागे राहिलेले सामान, मोबाईल फोन, लॅपटॉप, यासारख्या मौल्यवान वस्तू, प्रवाशांचे दागिने, रोख आदी परत मिळवून दिले आहेत. एप्रिल ते आक्टोंबर २०२३ या चालू आर्थिक वर्षात, ऑपरेशन’अमानत’अंतर्गत आरपीएफने सुमारे ८५७ प्रवाशांचे २.७७ कोटी रुपयाचे सामान परत मिळून दिले आहे. या ८५७ प्रवाशा पैकी ३७७ प्रवाशांचे १.६३ कोटी रुपयाचे सामान एकट्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात परत मिळविण्यात आले. यात भुसावळ विभाग १८२ प्रवाशांचे ५०.४५ लाखाच्या किमतीचे सामान, नागपूर विभाग १६८ प्रवाशांचे ३६९७ लाख रुपये किमतीचे सामान, पुणे विभाग ५८ प्रवाशांचे १३.९४ लाख रुपये किमतीचे सामान, सोलापूर विभाग ७२ प्रवाशांचे १३.९९ लाखाच्या किमतीचे सामानाचा समावेश आहे. रेल्वे संरक्षण दलाच्या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीला अडथळा आधी विविध सुरक्षा आव्हानांना तोंड द्यावे लागते. अत्यंत समर्पण सत्करतेने आणि धरियाणे आर पी एफ आपले कर्तव्य पार पडतात. त्यामुळे प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून चढू नये किंवा उतरू नये. जीव अमूल्य आहे असे शिवाजी मान सप्रे जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे यांनी सदर माहिती सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here