Home भंडारा संविधानामुळेच विविध जाती, धर्माचे लोक एकत्र ,ओबीसी समाजाने संविधान समजून घेणे गरजेचे...

संविधानामुळेच विविध जाती, धर्माचे लोक एकत्र ,ओबीसी समाजाने संविधान समजून घेणे गरजेचे –सामाजिक कार्यकर्त्या निमाताई रंगारी

100
0

आशाताई बच्छाव

IMG_20231128_082033.jpg

संविधानामुळेच विविध जाती, धर्माचे लोक एकत्र ,ओबीसी समाजाने संविधान समजून घेणे गरजेचे –सामाजिक कार्यकर्त्या निमाताई रंगारी

समता मुलक युवा मंच तर्फे संविधान दिन समारोह कार्यक्रम संपन्न

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )पवनी तालुक्यातील अड्याळ येथे 26 नोव्हेंबर ना संविधान दिवस समारोह कार्यक्रमाचे आयोजन 67 व्या संविधान दिनानिमित्त समता मुलक युवा मंच तर्फे गुजरी चौक येथे आयोजित आलेले होते .यावेळी सरपंच शिवशंकर मुंगाटे ,पंचायत समिती सदस्य सीमा गिरी, प्रा लालचंद रामटेके, ग्रामविकास अधिकारी साखरे मॅडम ,माजी उपसरपंच मुन्ना बोदलकर, सामाजिक कार्यकर्त्या निमा रंगारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज ,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा ,साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे या महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करण्यात आले . त्यानंतर व्यासपीठावरून मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यकर्त्या निमाताई रंगारी म्हणाल्या की, या या देशातील विविध जाती धर्मातील लोकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांची संविधान दिले. त्या संविधानात सर्वप्रथम कोणत्या समाजाला अधिकार दिले असेल तर ते सर्वप्रथम ओबीसी समाजाला. परंतु अजून पर्यंत या देशातील ओबीसी समाजाला समजलेले नाही .ज्या बाबासाहेबांनी लोकसंख्येच्या आधारावर आपल्या संविधानात 340 व्या कलमानुसार 52% ओबीसींना आरक्षण दिले परंतु काही मनुवादी विचारसरणीचे लोक या आरक्षणाचा आम्हाला फायदा झालेला नाही असे म्हणत आहेत .परंतु या आरक्षणामुळेच ओबीसी समाजाने शिक्षण ,नोकरी क्षेत्रात प्रगती केलेली आहे म्हणून संविधान समजून घेणे गरजेचे आहे .त्याचप्रमाणे त्या पुढे म्हणाल्या की , त्यावेळी किस्सा सांगताना म्हणाल्या की, डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहून झाल्यानंतर घरी बसले असताना एकदा ओबीसी समाजाचे नेते डॉ. पंजाबराव देशमुख सायंकाळच्या सुमारास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी आले व त्यांना म्हणाले की, या संविधानात ओबीसी समाजासाठी काही लिहिले आहे काय ?यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर हसत म्हणाले ,मी काही कामानिमित्त बाहेर जात आहे तोपर्यंत आपण संविधान वाचून काढावं यावेळी संविधान त्यांनी वाचून काढले त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात अश्रू आले व हा माणूस केवढा महामानव आहे की ज्या मानवाने आपल्या समाजासाठी तर लिहिलेत परंतु सर्वात प्रथम ओबीसी समाजाला न्याय देण्याचे काम केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते. त्याचप्रमाणे रात्री नऊ वाजता संगीतमय सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम कव्वालीचा संविधान मनोहरे अमरावती व त्यांच्या संचाचे आयोजन करण्यात आले होते.

Previous articleपश्चिम विदर्भाला अवकाळी पावसाचा फटका, तीन तालुक्यात अतिवृष्टी; ३५हजार हेक्टर मधील पीकांचे नुकसान.
Next articleरेल्वे सुरक्षा बलाच्या’मिशन जीवन रक्षक’ने वाचविले ६६लोकांचे प्राण.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here