Home अमरावती पश्चिम विदर्भाला अवकाळी पावसाचा फटका, तीन तालुक्यात अतिवृष्टी; ३५हजार हेक्टर मधील पीकांचे...

पश्चिम विदर्भाला अवकाळी पावसाचा फटका, तीन तालुक्यात अतिवृष्टी; ३५हजार हेक्टर मधील पीकांचे नुकसान.

87
0

आशाताई बच्छाव

IMG_20231128_081646.jpg

पश्चिम विदर्भाला अवकाळी पावसाचा फटका, तीन तालुक्यात अतिवृष्टी; ३५हजार हेक्टर मधील पीकांचे नुकसान.
–_———–
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती विभागीय संपादक.
अमरावती
विदर्भात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे अमरावती, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यास चांगलाच फटका बसला आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिनखेडराजा, देऊळगाव राजा व मेहकर या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.२४ तासात विभागात सरासरी ३३.५मी मी पावसाची नोंद झाली आहे. या पत्ती मध्ये वाशिम जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला. याशिवाय अकोला जिल्ह्यात ८, बुलढाणा जिल्ह्यात८६व वाशिम जिल्ह्यात ९१ शेळ्या मेंढ्या व एक बैल असे एकूण १८५ लहान मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय बुलढाणा जिल्ह्यात ५२ व वाशिम जिल्ह्यात १ अशा एकूण 53 घरांची पडझड झाली. या पत्ती मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील ३३.९५१ हेक्टर मधील कपाशी, तुर, फळपिके, जवारी व भाजीपाला तसेच वाशिम जिल्ह्यात ४०२ हेक्टर मधील कपाशीचे नुकसान झाल्याचा विभाग आयुक्त कार्यालयाचा प्राथमिक अहवाल आहे. या २४ तासात बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक ५४.५मी मी,वाशिम५०.५,अको२८.४, यवतमाळ २७.२,व अमरावती जिल्ह्यातील १३.८मी मी पावसाची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here