Home नाशिक नमन एज्युकेशन संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये फ्रेंडशिप डे उत्साहात साजरा

नमन एज्युकेशन संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये फ्रेंडशिप डे उत्साहात साजरा

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20220807-WA0018.jpg

नमन एज्युकेशन संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये फ्रेंडशिप डे उत्साहात साजरा
नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे
‘नमन एज्युकेशन सोसायटी’ संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव शाळेमध्ये फ्रेंडशिप डे उत्साहात संपन्न झाला .
आज विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत
नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.संजय बागुल उपाध्यक्षा,सौ.सरिता बागुल ,रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
06 ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी फ्रेंडशिप बँड आणले होते. सर्वप्रथम जयश्री चौधरी यांनी फ्रेंडशिप डे चे महत्व सांगून कार्यक्रमाला सुरुवात केली. यावर्षी एका वेगळ्या पद्धतीने म्हणजेच आपण नेहमी फ्रेंडशिप बँड फक्त आपले शिक्षक, वर्गमित्र यांनाच बांधतो. पण यावर्षी झाडांचे महत्त्व सांगून त्या झाडांना फ्रेंडशिप बँड बांधण्यात आले. वृक्ष सुद्धा आपले मित्र असतात. ते आपल्याला फळ देतात, सावली देतात, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते आपल्याला जीवन म्हणजेच ऑक्सिजन देतात. त्यामुळे ते आपले खरे मित्र असतात. सर्वप्रथम शाळेचे अध्यक्ष श्री. बागुल तसेच उपाध्यक्षा,सौ. बागुल यांनी झाडांना फ्रेंडशिप बँड बांधले. त्यानंतर प्रिन्सिपल मॅम तसेच सर्व शिक्षक वर्ग आणि सर्व विद्यार्थ्यांनी झाडांना फ्रेंडशिप बँड बांधून झाडे वाचवा, जीवन वाचवा असा संदेश देऊन आज हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडण्यात रेंनबो इंटरनशनल स्कूलच्या शिक्षिका जयश्री चौधरी ,रूपाली शिंदे ,एडना फर्नांडिस ,मोनाली गायकवाड सुषमा बावणे चैताली अहिरे मॅम, रोहिणी पांडे तसेच मदतनिस वैशाली बागूल, छाया आवारे, अनिता नेमणार, रवींद्र पटाईत तसेच ड्रायव्हर मंगेश शिंदे, विनोद चौधरी, बाळू गायकवाड, सागर कदम, नासीर खान पठाण, चंद्रकांत बागूल, गजानन पवार यांनी अतोनात मेहनत घेऊन हा कार्यक्रम छान प्रकारे पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here