Home परभणी अमृतेश्वर मठ संस्थान जिंतूर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

अमृतेश्वर मठ संस्थान जिंतूर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20220714-WA0031.jpg

अमृतेश्वर मठ संस्थान जिंतूर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

विष्णू डाखुरे ( जिंतूर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

जिंतूर : गुरुपौर्णिमा निमित्त बुधवारी अमृतेश्वर मठ संस्थान जिंतूर येथे गुरुपौर्णिमा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. वीरशैव लिंगायत समाजाच्या युवक मंडळीने सदरील उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम गुरुवर्या चे ईस्टलिंग पूजन करण्यात आले. १०८ अमृतेश्वर शिवाचार्य महाराज मठाधिपती यांचे महा पूजन करण्यात आले. त्यानंतर शिवाचार्य महाराज यांचे प्रवचन झाले. आणि शेवटी आलेल्या सर्व सद्भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.सदरील कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे कु. अश्विनी बारहत्ते ह्या वीर्शैव भगिनीने स्वहस्ते अमृतेश्वर शिवाचार्य महाराज यांची हुबेहूब काढलेली रांगोळी प्रतिमा रेखाटलेली ही रांगोळी कलेचा अद्भुत आविष्कार होता. सर्व वीरशैव बांधवांच्या हस्ते तिचा सत्कार कौतुक करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी ते साठी संदीप आप्पा लकडे (शिवा संघटना तालुका अध्यक्ष ) मनोज तोडकर, महेश मुलंगे, शिवम दसमले, रमेश संगेकर, शिवा हळदे, मंदार घळे, विशाल घळे, महेश बारहत्ते, माधव वाढणकर, संदीप चवरे, आकाश लकडे, विश्वनाथ हळदे, प्रवीण बोबडे, नागेश बल्लमखाणे, अंकुश संगेकर, गणपत फारतखाने, दीपक फाले, राजेश सातपुते व समस्त वीरशैव लिंगायत समाज उपस्थित होता.

Previous articleसप्तशृंगी गडावर सुरक्षा रक्षकाचा निर्घृणरित्या खुन
Next articleअतिवृष्टीमुळे शहरामध्ये घरात पाणी शिरल्याने खा.अशोक नेतेंनी केली पाहणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here