Home गडचिरोली अतिवृष्टीमुळे शहरामध्ये घरात पाणी शिरल्याने खा.अशोक नेतेंनी केली पाहणी

अतिवृष्टीमुळे शहरामध्ये घरात पाणी शिरल्याने खा.अशोक नेतेंनी केली पाहणी

133

आशाताई बच्छाव

IMG-20220714-WA0032.jpg

अतिवृष्टीमुळे शहरामध्ये घरात पाणी शिरल्याने खा.अशोक नेतेंनी केली पाहणी

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गडचिरोली जिल्ह्यात व शहरामध्ये दोन-तीन दिवस सततच्या पावसाने व अतिवृष्टीने घरात पाणी शिरल्याने नागरिकांची जनजीवन विस्कळीत झाले.या अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसाने घराचे व शेतीचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गडचिरोली शहरामध्ये रेड्डी गोडाऊन, राधे बिल्डिंग,कॅम्पएरिया, रामनगर, या ठिकाणची पाहणी केल्यानंतर पाण्याचा प्रवाह पाणलोटमुळे नालीचा पाणी चोकप झाल्याने व नालीच्या बांधकामाची उंची कमी असल्याने तसेच रोडची उंची सुद्धा खाली असल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले ही बाब निदर्शनास आली.

गडचिरोली शहरामध्ये दोन-तीन दिवस सततच्या पावसाने व अतिवृष्टीने घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होऊन फार मोठ्या प्रमाणात नुकसान सुध्दा झालेला आहे.
यावर उपाययोजना करावे कींवा काय उपाययोजना केल्या जातील.असे निर्देश मुख्याधिकारी व बांधकाम अभियंता यांना खा.अशोकजी नेते यांनी दिले.
याप्रसंगी खा.अशोकजी नेते, अनिल पोहनकर,निखिल चरडे,प्रकाश निकुरे,बंटी खडसे, नंदु कुंभारे, हर्षल गेडाम,विशाल वाघ मुख्याधिकारी,अंकुश भालेराव बांधकाम अभियंता विजय कुमरे, तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleअमृतेश्वर मठ संस्थान जिंतूर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
Next articleडॉ.नामदेव किरसान पूरग्रस्तांना करणार 1लक्ष रुपयांची मदत वाढदिवसाच्या निमित्ताने घेतले संकल्प
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.