Home जळगाव मराठा समजाला टिकणारे आरक्षण मिळावे – बापूसाहेब शिरसाठ (पाटील), प्रमोद बापू पाटील,...

मराठा समजाला टिकणारे आरक्षण मिळावे – बापूसाहेब शिरसाठ (पाटील), प्रमोद बापू पाटील, गणेश पवार,

35
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231029-055243_WhatsApp.jpg

मराठा समजाला टिकणारे आरक्षण मिळावे – बापूसाहेब शिरसाठ (पाटील), प्रमोद बापू पाटील, गणेश पवार,

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ओबीसी प्रमाणे तात्काळ सवलती द्या
जे १००% राज्य सरकारच्या अधिकारात आहे, मराठा आरक्षणासाठी झालेल्या आत्तापर्यंतच्या सर्व आंदोलनाचे गुन्हे (आंतरवाली सराटी सह) तात्काळ मागे घ्यावे आदी मागण्यासाठी सकल मराठा समाज आणि संभाजी सेनेच्या वतीने येथील ग्रीन लीफ हॉटेल मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
सरकारने मराठा समाजाचा आता अंत पाहू नये अन्यथा समाजातील तरुणांचा उद्रेक झाला तर आत्तापर्यंत आत्महत्या करून जीव देणाऱ्या तरुणांनी उद्या शासनकर्त्यांचे जीव घेतले तर विशेष वाटून घेऊ नये तरी शासनाने तात्काळ मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी करून मराठा समाजाला न्याय द्यावा असा ईशारा लक्ष्मण बापू शिरसाठ (पाटील) यांनी दिला आहे.
यावेळी प्रमोद बापू पाटील, सरपंच गिरीश पाटील, जयसिंग भोसले, भाऊसाहेब पाटील, मार्केट संचालक राहुल पाटील, तमाल देशमुख आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते. प्रमोद पाटील म्हणाले की महाराष्ट्रातील मराठा समाजाची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आणि बिकट झाली आहे
मराठा समाजातील शिक्षित उच्चशिक्षित तरुण-तरुणींना चांगले शिक्षण घेऊन चांगले मार्क्स (गुण) असून देखील पात्रता असून देखील त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकरी मिळत नाही. मराठा समाजातील तरुण आज अक्षरशः हॉटेलात चहाच्या टपरीवर मिळेल ती पडेल ती कामे करीत आहेत काही रिक्षा चालवत आहेत तर काही अक्षरशः हमाली करत आहेत.
गणेश पवार म्हणाले मराठा समाजातील तरुणींची परिस्थिती देखील याच्यापेक्षा काही वेगळी नसून तरुणी देखील मॉल कापड दुकाने विविध वस्तूंचे गाड्यांचे शोरूम अशा ठिकाणी कामे करावे लागत आहेत एकूणच काय तर मराठा समाज आज पूर्णतः सामजिक आणि आर्थिक मागास झाला आहे आणि त्यामुळे दिवसेंदिवस मराठा समाजातील युवक युवती वैफल्यग्रस्त होत आहेत.
त्यातून आत्महत्या देखील खूप वाढायला लागल्या आहेत. सद्य परिस्थितीत मराठा समाज आरक्षण नसल्यामुळे दिवसेंदिवस अत्यंत वाईट परिस्थितीचा सामना करीत आहे आणि त्यामुळे समाजातील युवकांचा प्रक्षोभ आणि आक्रोश दिवसें दिवस वाढत चालला आहे त्यामुळे ही परिस्थिती तात्काळ थांबावी अशी मागणी केली.

Previous articleठेंगोडयात डेंगूचे थैमान एक तरुणीचा बळी;शंभरावर रुग्ण प्रशासनाचा निष्काळजीपणा भोगताय नागरीक!
Next articleजयबाबाजी चौकात घरफोडी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here