Home नांदेड देगलूर उपजिल्हा रुग्णालयास तहसीलदार मा. राजाभाऊ कदम यांची भेट

देगलूर उपजिल्हा रुग्णालयास तहसीलदार मा. राजाभाऊ कदम यांची भेट

99
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231013-184008_WhatsApp.jpg

देगलूर उपजिल्हा रुग्णालयास तहसीलदार मा. राजाभाऊ कदम यांची भेट

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

दि .१२/१०/२०२३ देगलुर उपजिल्हा रुग्णालयात तहसिलदार मा. राजाभाऊ कदम, नायब तहसिलदार नागमवाड सह सहकार्यासह भेट दिली या वेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. नरेश देवणीकर , डॉ. मलशेटवार विश्वनाथ, डॉ. संभाजी पाटील, डॉ‌. लाडके संजय, डॉ. सुनील जाधव, सिस्टर मनिषा बोइनवाड , औषध निर्माता पुंजपवार , ओ. एस. मोरे सर सह कर्मचारी उपस्थित होते.
रुग्णालयातील व्यवस्था, बाह्य रुग्ण, आंतर रुग्ण, रक्त प्रयोग शाळा, बाळंतीण कक्ष, शस्त्र क्रिया कक्ष , सी. टी. स्कॅन, औषधी पुरवठा, पाणी पुरवठा , विद्युत पुरवठा, औषधी, ऑक्सिजन प्लांट, नेत्र शस्त्रक्रिया ग्रूह आदि ची पाहणी करून केंद्र शासन आरोग्य विभागाने लक्ष अंतर्गत देगलुर ला राज्यात प्रथम क्रमांका ने गौरविले त्या बद्द्ल समाधान व्यक्त केले. या व्यतिरिक्त असलेल्या कमतरता रिक्त पदे व सफाई कर्मचारी, औषधी, ( ए आर एस ) अँटी रॅबीज सिरम इंजेक्शन उपलब्ध करण्याबद्दल सुचना दिल्या. बाळंतपण, सिजेरियन सेक्शन, अपघात, सर्पदंश, विषबाधा, हृदय रोग, नेत्र शस्त्र क्रिया सहगंभीर रुग्णांना सर्व सुविधा मिळण्याची उपाय योजना व्हावी गोर गरीब, गरजूंना आरोग्य सेवा, वेळेत मिळावी यासाठी मा. तहसीलदार राजाभाऊ कदम सह वैद्यकीय अधिक्षक डॉ. नरेश देवणीकर व टिम ने रुग्णांशी संवाद साधुन विचार पुस करून अडचणी जाणुन घेतल्या. रुग्णालयातील प्रत्येक विभागाची पाहणी करून त्यातील समस्या व त्यावरील उपाय करून ज्यास्तीत ज्यास्त आरोग्य सुविधा मिळण्यासाठी प्रत्येक योजना प्रभावी पणे अंमलात आणण्यासाठी सुचित केले व उपलब्ध नसलेल्या औषधी, सुख सोयी,सक्षम वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी, तर आवश्यक ईतर यंत्रणा, मनुष्यबळ, आवश्यक औषधी पुरवठा आदी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येतील असे प्रतिपादन केले.

Previous articleधर्माचे स्टेटस ठेवल्याने स्वतःचे स्टेटस उंचावत नाही -पंकज वानखेडे
Next articleउद्या शनिवारी दारु दुकाने राहणार बंद जिल्हाधिका-यांचे आदेश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here