Home भंडारा धर्माचे स्टेटस ठेवल्याने स्वतःचे स्टेटस उंचावत नाही -पंकज वानखेडे

धर्माचे स्टेटस ठेवल्याने स्वतःचे स्टेटस उंचावत नाही -पंकज वानखेडे

57
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231013-183523_WhatsApp.jpg

धर्माचे स्टेटस ठेवल्याने स्वतःचे स्टेटस उंचावत नाही -पंकज वानखेडे

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटने तर्फे तरुण – तरुणीं ना आवाहन .

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी)
सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करणारे स्टेटस ठेवून अनेक जण स्वतःला कट्टर धर्मवादी समजत आहेत व तसे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु धर्मा- धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या स्टेटस ठेवल्याने माणसाचे स्टेटस उंचावत नाही तर शिक्षण घेऊन मोठ्या पदावर गेल्याने आपले स्टेटस उंचावते. तरुण पिढीने स्वतः च्या जातीचा अभिमान बाळगला पाहिजे परंतु आपल्यामुळे इतर धर्मियांच्या भावना दुखावतील किंवा जातीय तणाव निर्माण होईल अशा स्टेटस ठेवून स्वतःचे भवितव्य अंधाकारमय करून घेऊ नये , असे आवाहन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य चे उपाध्यक्ष पंकज दिलीपराव वानखेडे यांनी केले आहे.
“हिंदू मुस्लिम शीख इसाई…हम सब हैं भाई – भाई….”
‘”हम सब एक है'” या म्हणी प्रमाणे एक दुसऱ्याच्या धर्माचा आदर करणे ही भारत देशाची संस्कृती आहे. देश आपला आहे, संस्कृती आपली आहे त्यामुळे तीचे संरक्षण करणेही आपलीच जबाबदारी आहे. परंतु काही विघ्नसंतोषी समाजकंटकाच्या नादी लागून तरुण पिढी स्वतःला कट्टर सिद्ध करण्यासाठी एकमेकांच्या धर्माचा अवमान करणाऱ्या पोस्ट समाज माध्यमावर टाकत आहेत . त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे लागत आहेत. गुन्हे दाखल झालेल्या सुशिक्षित बेरोजगार युवकाचे आयुष्य अक्षरशः संपुष्टात येत आहे. गुन्हा दाखल झालेल्या तरुणाला कुठल्याही शासकीय नोकरीसाठी पोलिसांकडून मिळणारे कॅरेक्टर सर्टिफिकेट (चारित्र्य प्रमाणपत्र) मिळणार नाही, त्याला पासपोर्ट – विसा सारख्या सुविधा मिळणार नाहीत. तसेच पोलीस ठाण्यात त्याचे वाईट चारित्र्य असल्यामुळे कोणत्याही धार्मिक उत्सवाच्या वेळी त्याला हद्दपार सारख्या समस्येला सामोरे जावे लागते. जेणेकरून तो कोणतीही धार्मिक उत्सव आपल्या कुटुंबासोबत घरी साजरा करू शकणार नाही.
कोणतेही जातीय तेढ निर्माण करणारे कृत्य करण्या अगोदर आई, वडील, घरातील मंडळी तसेच आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार एक वेळ आवश्यक करावा .
सध्या सर्वत्र व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून १६ ते २२ वर्ष वयोगटातील तरुण एक दुसऱ्याच्या धर्मा विरोधात बोलत असल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत सामाजिक सलोखा लोप पावत आहे आणि यातूनच विनाकारण जातीय दंगली घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे शांतता — सु – व्यवस्था ठेवणे आपली सर्वांची जबाबदारी आहे , असे आवाहन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांनी केले.

Previous articleमराठी शाळा टिकविणे काळाची गरज
Next articleदेगलूर उपजिल्हा रुग्णालयास तहसीलदार मा. राजाभाऊ कदम यांची भेट
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here