• Home
  • *वसाका जमीन धारक कामगारांचे उपोषण तहसिलदारांच्या मध्यस्थी नंतर मागे*

*वसाका जमीन धारक कामगारांचे उपोषण तहसिलदारांच्या मध्यस्थी नंतर मागे*

*वसाका जमीन धारक कामगारांचे उपोषण तहसिलदारांच्या मध्यस्थी नंतर मागे* सटाणा,( जगदिश बधान तालुका ग्रामीण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)– वसंत दादा सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी व जमिन धारक कामगारांनी आज देवळा येथिल जुने तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसले असता तहसिलदारांच्या मध्यस्ती नंतर उपोषण मागे घेतले ,कोरोणाच्या पार्श्र्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत जमीन धारक कामगार,आपल्या बायका मुलांसह आमरण उपोषणाला बसले होते , कामगारांच्या धकित वेतनासह कारखाना सुरू करणे साठी प्रशाशनाने तात्काळ कार्यवाही करावी म्हणुन आग्रही भूमिका घेतली असता , तहसिलदार दत्तात्रेय शेजुळ यांनी कामगारांची बाजु एकुन घेऊन ,तात्काळ धाराशिव कारखाना प्रशाशन ,साखर आयुक्त , प्रादेशिक सहसंचालक अहमदनगर , यांना आपल्या भावना तात्काळ कळवण्याचे आश्वासन दिल्यानंतर ,कोरोणाच्या पार्श्र्वभूमीवर कामगारांनी सामंजस्य दाखवून उपोषण मागे घेण्यात आले , कारखाना सुरू करणे संदर्भात तात्तकाळ कार्यवाही न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा जमीन धारक कामगारांचे नेते शशिकांत पवार यांनी दिला , यावेळी वसाका मजदुर युनियन चे अध्यक्ष अशोक देवरे कार्याध्यक्ष कुबेर जाधव ,वंसत पगार ,आनंदा देवरे ,प्रताप देवरे , दादाजी सोनवणे , समाधान निकम ,निंबा निकम ,भरत पवार , हंसराज पवार , सुधाकर सुर्यवंशी , नानाजी पवार ,मंहेद्र पवार ,पोपट वाघ , दोधा पवार आदी सहभागी झाले होते , यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजु शिरसाठ , समन्वयक कुबेर जाधव ,प्रहार शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष कृष्णा जाधव यांनी पुर्णवेळ पाठींबा दर्शवुन भविष्यात वसाका सुरू करणे साठी प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी असे ठाम पणे सांगितले , यावेळी लोहणेर ,सटवाईवाडी ,विठेवाडी शिवारातील शेतकऱ्यांनी पाठींबा देण्या साठी गर्दी केली होती ,,

anews Banner

Leave A Comment