Home Breaking News 🛑 मंत्रीमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीची….! महत्त्व पूर्ण बैठक संपन्न 🛑

🛑 मंत्रीमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीची….! महत्त्व पूर्ण बैठक संपन्न 🛑

82
0

🛑 मंत्रीमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीची….! महत्त्व पूर्ण बैठक संपन्न 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ राज्यातील मराठा समन्वयक, अभ्यासक, कार्यकर्ते, मुंबई आणि दिल्ली येथील विधीज्ञ, हस्तक्षेप याचीका कर्ते यांच्या सोबत एक व्यापक बैठक अत्यंत सकारात्मक आणि विधायक चर्चेद्वारे पार पडली. तीन तास चाललेल्या या बैठकीत मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष ना .अशोकराव चव्हाण,ना. बाळासाहेब थोरात, ना. एकनाथ राव शिंदे यांच्या सह मराठा आरक्षणाचे जेष्ठ अभ्यासक आणि सर्वोच्च न्यायालया तील मराठा समाजा च्या वतीने मुख्य हस्तक्षेप याचीका कर्ते राजेंद्र दाते पाटील, आ.श्री विनायक मेटे,राजेंद्र कोंढरे,डॉ संजय लाखे पाटील, दिलीप पाटील, विनोद पोखरकर, विवेक कुराडे , आप्पासाहेब कुढेकर ,रमेश केरे,डॉ ,संदीप गिड्डे,,महेश राणे,वकील संतोष सूर्यराव,करण गायकर,गणेश कदम ,युवराज सुर्यवंशी, योगेश पवार,गणेश काटकर, विनोद पाटील,डॉ कांचन वडगावकर, विवेक सावंत, वकील राजेश टेकाळे,वकील आशिषराजे गायकवाड, विलास सुद्रीक,प्रविण पाटील आदी समन्वयक उपस्थित होते तसेच राज्य सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ वकील राहुल चिटणीस वकील सचिन पाटील हे ही प्रामुख्याने उपस्थित होते.

चर्चेत झूम माध्यम समन्वयक’ म्हणून अभिजीत देशमुख यांनी- सर्वांना चर्चेत वाव देऊन सुसंवाद घडवुन आणला. या बैठकीत प्रामुख्याने येत्या दि 25 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी संदर्भात विस्तृत चर्चा झाली आणि मराठा समाजाच्या वतीने मुख्य हस्तक्षेप याचीकाकर्ते राजेंद्र दाते पाटील यांनी घटना पीठाकडे प्रलंबित असलेल्या याचीका क्रमांक 55 जनहीत अभियान विरुद्ध भारत सरकार आणि याचीका क्रमांक 365 गायत्री विरुद्ध तामीलनाडु या सोबत टॅग करने बाबत सविस्तर चर्चा हौऊन वकील सूधांषु चौधरी आणि वकील दिलीप तौर यांच्याच याचीकावर सुनावणी होणार असल्याचे शासनाचे जेष्ठ वकील राहुल चिटणीस आणि वकील सचिन पाटील यांनी स्पष्ट करतांना शासन आता मा.मुख्य न्यायमूर्ती यांचे कडे कुठलाही अर्ज 25 तारखेची सुनावणी होई पर्यंत सादर करणार नाही हे सुद्धा स्पष्ट केले असुन राजेंद्र दाते पाटील यांच्या हस्तक्षेप याचीकेतील महत्त्वाचा विषय घटनापीठाकडे टॅग करण्या संदर्भात ठोस भुमिका घेण्याचे निश्चित केले.

मागील सरकारच्या काळात काढलेल्या शासन आदेशांचे अंमलबजावणी संदर्भात लवकरच निर्णय घेणार तर मराठा समाजाचे इतर प्रलंबित प्रश्न जिल्ह्याला वसतीगृहे शिष्यवृत्ती ,विद्यावेतन आणि सारथी च्या वतीने तरूणांसाठी ऊपक्रम.क्रांतीमोर्चा तील विविध खटले परत घेणे कोपर्डी प्रकरण न्यायालयीन पाठ पुरावा इ एस बी सी 2014 नियुक्ती प्रकरणे,आरक्षणा प्रमाणे नोकरीत वाटा,तारादूत,सर्वोच्च न्यायालया त हस्तक्षेप याचीका कर्ता व राज्य सरकारने वैद्यकीय आरक्षण टिकवले, आरक्षण लढ्यात शहीद झालेल्यांच्या कुटुंबीयांना शासकीय नोकरी आणि दहा लक्ष रू देण्याचा निर्णय आणि सारथी संस्थेची मागील सरकारच्या काळासह संपुर्ण थकबाकी रकमे पैकी जवळपास 08 कोटी दिल्याबद्दल व अधिकची निधी उपलब्ध करुन देण्याचे मान्य केल्या बद्दल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सरकार सह मंत्रीमंडळ उपसमिती चे अध्यक्ष ना. अशोकराव चव्हाण व संपुर्ण समितीचे आणि सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.सदर बैठक व्हावी म्हणून सतत पाठ पुरावा करणारे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले.

मंत्रीमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीची महत्वपूर्ण बैठक संपन्न …..! ⭕

Previous article🛑 विद्यार्थ्यांना भरावा लागेल डिक्लेरेशन फॉर्म; कशी होणार परीक्षा जाणून घ्या 🛑
Next article*वसाका जमीन धारक कामगारांचे उपोषण तहसिलदारांच्या मध्यस्थी नंतर मागे*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here