Home भंडारा १५ ला पवनी येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती निवड चाचणी

१५ ला पवनी येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती निवड चाचणी

47
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231013-073647_WhatsApp.jpg

१५ ला पवनी येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती निवड चाचणी

संजीव भांबोरे
भंडारा: (जिल्हा प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ पुणेच्या मान्यते नुसार भंडारा जिल्हा तालीम कुस्तीगीर संघाच्या वतीने
दिनांक १५ आक्टोबर २०२३ ला सकाळी ९ वाजता जिल्हास्तरिय निवड चाचणीचे आयोजन संताजी सभागृह बेलघाटा वार्ड पवनी जि. भंडारा येथे होणार आहे.
महाराष्ट्र केसरी वरिष्ठ गटाची भंडारा जिल्हा तालीम कुस्तीगीर संघाची निवड चाचणी स्पर्धेत गादी व माती वजन गट ५७ कीलो, ६१ कीलो, ६५ कीलो, ७० कीलो, ७४ कीलो, ७९ कीलो, ८६ कीलो, ९२ कीलो, ९७ कीलो व ८६ ते १२५ कीलो गटात होईल. आणि यामधून महाराष्ट्र केसरी कुस्ती करिता निवड होणार आहे.
वरीष्ठ गट राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कीताबासाठी नोव्हेंबर महीण्यात पुणे जिल्ह्यात येणाऱ्या हवेली तालुक्यातील फुलगाव येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत संधी मिळणार आहे.
तरी भंडारा जिल्ह्यातील जास्तीत – जास्त पहेलवानांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन तालीम कुस्तीगीर संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत व्यंकटराव खोब्रागडे, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत सेलोकर, सचिव रामदास वडिचार, नामदेव सुरकर, हरिश तलमले, डॉ. मनोज देशमुख, प्रशांत मानापुरे, गोपाल भिवगडे, विकास देशमुख, दिनेश तलमले, नरेश तेलमासरे, गोविंदा देशमुख, गोपाल परिहार, परवेश ज्ञानेश्वर देशमुख
यांनी केले आहे.

Previous articleअड्याळच्या राजाला मिळाले जिल्ह्यातील प्रथम पारितोषिक
Next articleव्यवस्था बदलासाठी राज्यकर्ताना विधिमंडळ अधिवेशनापर्यंत: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात; नाहीतर रस्त्यावर उतरू.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here