Home रत्नागिरी कुंभार्ली महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षपदी प्रसाद गोविंद कोलगे यांची बिनविरोध निवड

कुंभार्ली महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षपदी प्रसाद गोविंद कोलगे यांची बिनविरोध निवड

140

आशाताई बच्छाव

IMG-20220825-WA0061.jpg

कुंभार्ली महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षपदी प्रसाद गोविंद कोलगे यांची बिनविरोध निवड                      रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ)

कुंभार्ली ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी युवा कार्यकर्ते प्रसाद कोलगे यांची एकमताने निवड करण्यात आली.

दि. २३ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत सन २०२२-२३ या कार्यकालासाठी कुंभार्ली ग्रामस्थांनी बिनविरोध निवड केली. पूर्व विभागातील कुशल युवा नेतृत्व म्हणुन प्रसाद कोलगे यांची ओळख असून गेली अनेक वर्षे युवक, कामगार, व ग्रामस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने योगदान देत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल कुंभार्लीचे सरपंच श्री रवींद्र सकपाळ उपसरपंच श्री.संदिपशेठ कोलगे , राजाभाऊ नारकर , माजी तंटामुक्ती अध्यक्ष विलास मोहिते ,योगेश शिंदे , दिनेश लब्धे , प्रशांत कोलगे , निखिल सांगळे , बाळू जाधव , गणेश जाधव , शार्दुल बाईत, राहुल पाष्टे , मारुती लांबे, संकेत भंडारे , अनिल मोहिते , आकाश कोलगे, सर्व ग्रा. पं. सदस्य आणि ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous articleराज्यपाल नियुक्त बारा आमदारांमध्ये रामदास कदम यांना संधी मिळण्याची शक्यता
Next articleठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांची शिवसेना शिंदे गटाच्‍या प्रवक्तेपदी नियुक्ती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.