Home अमरावती ग्रा. पं. गांगरखेडा अंतर्गत ग्राम तोरणवाडी येथे सामाजिक सुरक्षा योजना शिबिर संपन्न.

ग्रा. पं. गांगरखेडा अंतर्गत ग्राम तोरणवाडी येथे सामाजिक सुरक्षा योजना शिबिर संपन्न.

48
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231012-065300_WhatsApp.jpg

ग्रा. पं. गांगरखेडा अंतर्गत ग्राम तोरणवाडी येथे सामाजिक सुरक्षा योजना शिबिर संपन्न.

चिखलदरा प्रतिनिधी –
नागेश धोत्रे
मेळघाट युवा ब्यूरो चीफ

ग्राम तोरणवाडी येथे शिबिरामध्ये सामाजिक सुरक्षा योजना कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थानी मा .सौ.विमल तानु बेठेकर (सरपंच ग्रापंचायत गांगरखेडा) उपस्थित होते तसेच ग्राम पंचायत सदस्य श्री.गुरुदास मोरले व रोजगार सेवक श्री.प्रेमलाल मोरले व CRP महिला सौ. पूजा गुरुदास मोरले उपस्थित होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा. Advocate श्री. शिवराजी मोरले यांनी स्थान भुषविले या कार्यक्रमा दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून दिप प्रज्वलन केले त्याच प्रमाणे सामाजिक सुरक्षा योजना बाबत अनंत उईके यांनी मार्गदर्शन व सविस्तर योजना निहाय माहिती दिली व मार्गदर्शन केले. मा.सरपंच मॅडम यांनी पण लोकांना आपल्या बोलीभाषेमध्ये सविस्तर माहिती कळवुन दिले आशा प्रकारे खालील प्रमाणे योजना निहाम ऑनलाईन व ऑफलाईन काम करुन घेण्यात आले तसेच अल्पउपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या शिबिरामध्ये वेगवेगळ्या गावातील लोकांना पण वेग वेगळ्या सामाजिक सुरक्षा योजनेचे मदत मिळाली. शिबिरामध्ये आभा कार्ड, आयुष्मान कार्ड, मातृत्व वंदन योजना लाभार्थीच्या आधार अपडेट व नवीन बालकांचे आधार कार्ड तसेच मोबाईल नंबर अपडेट , श्रावण बाळ योजना व संजय गांधी निराधार योजना लाभार्थीचे कागतपत्र घेण्यात आले. तसेच बालसंगोपन योजनासाठी लाभार्थीचे कागतपत्र घेण्यात आले, नरेगा कामगार यांचे बांधकाम कामगार नोंदणी साठी ऑफलाईन फॉर्म पूर्णपणे भरून ग्राम सेवक साहेबांचे सही घेण्यात आली. तसेच ग्राम पंचायत कार्यालय संगणक परिचालक यांचा माध्यमाने नविन बालकांचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र तसेच विवाह नोंदनी प्रमाणपत्र काढण्यात आली. गाव स्तरावर शेतकऱ्यांचा ई-पीक नोंदणी करून देण्यात आली. व मतदान कार्ड साठी कागतपत्र घेण्यात आले. अशा प्रकारे आदिवासी व इतर मागासवर्गीय लोकांना शिबिरामधून खूप लोकांना युवा संस्था सामाजिक सुरक्षा योजनाचे वतीने गरिबांना फायदा झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here